AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका, चार आस्थापनांचं लायसन्स लगेच निलंबित

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील ४ अन्न आस्थापनांवर कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तपासणीत अस्वच्छता, ड्रेनेज समस्या, अन्नसाठवणुकीतील त्रुटी आणि क्रॉस-कंटॅमिनेशनसारख्या गंभीर अनियमितता आढळल्या.

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका,  चार आस्थापनांचं लायसन्स लगेच निलंबित
| Updated on: Aug 28, 2026 | 7:48 PM
Share

रिपोर्टर – कृष्णा सोनारवाडकर : महिन्याभरापासून महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवायांचा धडाका सुरूच असून त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीकडून गेल्या बऱ्याच काळापासून राज्यातील विविध हॉटेल्स , रेस्टॉरंट्स, तसेच अनेक क्विक-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती.  त्यातच आता FDA ने मुंबईतील चार अन्न आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासणीदरम्यान स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, अन्न साठवणूक तसेच क्रॉस-कंटॅमिनेशनसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे चारही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले .

मिळालेल्या माहितीनुसार, FDAच्या पथकाने कांदिवलीतील गरवारे इन्स्टिट्यूट कॅम्पस येथील अक्षय कोर्ट्स, BKC येथील Craftpac Hospitality Pvt. Ltd., Jio World Drive, दादर पश्चिम येथील मे. मारियन हॉटेल अँड रेस्टॉरंट आणि चेंबूर, टिळक नगर येथील मे. भगवती स्टोअर्स यांची तपासणी केली. मात्र त्यादरम्यान अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थिती आढळली. तिथे स्वच्छता, ड्रेनेज, अन्नसाठवणूक आणि क्रॉस-कंटॅमिनेशनबाबत गंभीर त्रुटी या तपासणीदरम्यान आढळल्या. त्यानंतर एफडीएच्या पथकाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत संबंधित चारही आस्थापनांचे लायसन्स तत्काळ निलंबित केलं.

यापूर्वीही FDA कडून मुंबईत कारवाई

अवघ्या 2-3 दिवसांपूर्वीही मुंबईत एफडीएकडून मोठी कारवाई करण्यात आली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित तीन अन्न आस्थापनांवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती. परमीट रूम, पॅव्हिलियन आणि मेडिटेरियन या तीन अन्न आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आलं होतं. त्यानंतर एफडीएने त्यांचे FSSAI परवाने निलंबित केले होते. तर आज पुन्हा एफडीने मुंबईतील विविध भागांतील आस्थापनांवर कारवाईचा दट्टा उगारल्याने अन्न आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे.

Blinkit, Zepto आणि Instamart वरही केली होती कारवाई

याआधी काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील विविध मोठ्या फूड जॉईंट्सवर कारवाई केली होती. त्यानंतर क्विक-कॉमर्स कंपन्यांनाही FDAच्या कारवाईचा दणका बसला. राज्यभरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तपासणीनंतर Blinkit, Zepto आणि Instamartशी संबंधित 14 फूड बिझनेस सेंटरचे परवाने निलंबित करण्यात आले होते. FDAच्या तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण (पेस्ट मॅनेजमेंट), अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, अन्नसुरक्षेशी संबंधित नोंदी, परवान्याचे प्रदर्शन तसेच इन्व्हेंटरी व्यवस्थापनातील FIFO (First In, First Out) या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची विशेष तपासणी करण्यात आली.

Follow Us
एकदा निर्णय झाला तो झलाच! जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत आंदोलन,
Manoj Jarange : एकदा निर्णय झाला तो झलाच! जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत आंदोलन, मुंबईतही...
साखरेचे दर घसरले पण आता दूध महागणार; किती रुपयांची होणार वाढ?
Milk Price : साखरेचे दर घसरले पण आता दूध महागणार; किती रुपयांची होणार वाढ?
सर्वसामन्यासाठी आनंदाची बातमी! अखेर साखरेच्या दरात मोठी घसरण; किती...
सर्वसामन्यासाठी आनंदाची बातमी! अखेर साखरेच्या दरात मोठी घसरण; किती रुपयांनी घट  झाली?
CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे... भर मंचावरून छगन भुजबळांचा...
CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे... भर मंचावरून छगन भुजबळांचा महाजनांना टोला, नेमकं काय म्हणाले?
कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
Nepal Flood : कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी..
मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलताच... काय घडलं?
गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे... मुरलीधर मोहळ यांचं मोठं विधान
गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे... मुरलीधर मोहळ यांचे गणेश मंडळाबाबत मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?
पुन्हा नाद करायचा... पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष तीव्र;
पुन्हा नाद करायचा... पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष तीव्र; संदीप वाघेरेंच्या बॅनरची तुफान चर्चा
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे..
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे कौतुक
महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब; प्रत्येक क्षण... नवा थरारक व्हिडिओ
Nepal Flood Update | महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब; प्रत्येक क्षण... नवा थरारक व्हिडिओ समोर