AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढेंचा मुंबईतील प्रसिद्ध आईस्क्रिम पार्लरला दणका; उंदिर अन् माशांचा वावर दिसताच परवाना रद्द

tukaram mundhe : तुकाराम मुंढे यांनी मुंबईत सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुंढेंच्या विभागाने प्रसिद्ध रुस्तम पार्लरला दणका दिला आे.

तुकाराम मुंढेंचा मुंबईतील प्रसिद्ध आईस्क्रिम पार्लरला दणका; उंदिर अन् माशांचा वावर दिसताच परवाना रद्द
| Updated on: Jul 09, 2026 | 8:32 AM
Share

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे यांनी मुंबईत एका प्रसिद्ध आईस्क्रिम पार्लरला दणका दिलाय. मुंबईच्या चर्चगेटमधील रुस्तम आईस्क्रिम पार्लरवर कारवाई केली. त्यानंतर लायसन्स रद्द देखील केलं आहे. या कारवाईनंतर इतर दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, आईस्क्रिम पार्लरमध्ये तपासणीदरम्यान स्वच्छतेविषयी गंभीर त्रुटी आढळून आल्या. पार्लरमध्ये जिवंत उंदीर, माशा आढळून आल्या. तपसाणीत नियमांचं उल्लंघन केल्याचे आढळल्याने पार्लरचा परवाना रद्द करण्यात आलाय.

एफडीएने आता पार्लरमधील काही नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीचा अहवाल येईपर्यंत पार्लर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, विभागाच्या एका पथकाने ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत छापा टाकला. यावेळी पार्लरमध्ये मुदत संपलेले पिस्ता, स्वीट ऑरेंज, चेरी, बदाम अमेरिकन आईस्क्रिम सोडा, मिक्स फ्रुट आढळून आले.

आईस्क्रिममध्ये त्यांचा वापर करण्यात येऊ नये, यासाठी तातडीने पदार्थ नष्ट केले. या आधी एका प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये उत्पादनामध्ये मिल्क फॅट साधारण 7.94 टक्के इतका आढळला होता. खरंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानुसार पदार्थांमध्ये मानक किमान 10 टक्के असले पाहिजे. परंतु कमी आढळल्याने पार्लरवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाकडून पार्लरवर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त पी. आर. सिंगारवाड आणि सहायक आयुक्त अनुपमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी तेजस्विनी पाटील आणि अशोक चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे.

तत्पूर्वी, नागपुरात ‘श्री हिरा स्वीट्स’ येथे मेलेल्या उंदिराच्या शेजारीच पदार्थ बनवण्याचे सुरू होते. ही बाब समोर येताच या आस्थापनावरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धुळ्यात हॉटेल पाटीलवाडा हे विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आलं. त्यानंतर त्या हॉटेलचाही परवाना रद्द करण्यात आलाय.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे