पवार साहेबांना आशीर्वाद देतील असे ‛हात’ नाहीत; रूपाली पाटील म्हणाल्या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यातच रूपाली पाटील मनसेला रामराम ठोकून धक्का दिला आहे.

पवार साहेबांना आशीर्वाद देतील असे ‛हात’ नाहीत; रूपाली पाटील म्हणाल्या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार
रूपाली पाटील.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 16, 2021 | 9:53 AM

पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ((Maharashtra Navnirman Sena) पुण्यातली मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅशिंग नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे या अखेर महाविकास आघाडीत आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावणार आहेत. अगदी कालपर्यंत कळतेय, समजतेय अशा चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी स्वतःच एक सूचक ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यातच त्यांना हा धक्का बसला आहे.

काय आहे ट्वीट…

रूपाली पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …त्यामुळे त्यांना आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश नक्की झाला आहे, हे अखेर जाहीर केले आहे.

खदखद पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त

मनसेचा नेमका कोणत्या कारणांमुळे राजीनामा दिला, या प्रश्नाविषयी काल विचारले असता, रुपाली पाटील म्हणाल्या, मनसेत निःस्वार्थी, प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. मी या परिवारात बहीण म्हणून नेहमी त्यांच्यासोबत असेन. पण माझी खदखद मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन. पण मला न्याय देत असताना, लोकांना उत्तर देत असताना खंबीरपणे साथीची गरज असते. तिच मिळत नसेल तर कार करणे अवघड होते. याविषयीच्या भावना राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. आता मला माझ्या गोष्टी परत परत सगळ्यांसमोर बोलून दाखवायच्या नाहीत. सन्माननीय राज ठाकरे माझे दैवत आहेत व राहतील.

राज ठाकरेंना भावनिक पत्र

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत”, असं भावनिक पत्र रुपाली पाटील यांनी राज ठाकरे यांना लिहिलं आहे.

वसंत मोरेंची रुपाली ठोंबरेंवर खोचक टीका

रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे. मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलं नाही, अशी बोचरी टीका मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे. पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होतेय अशी टीका रुपाली पाटील- ठोंबरे यांनी केली होती, मात्र रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं असेआव्हानही वसंत मोरे यांनी केले आहे.

इतर बातम्याः

Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर, दौऱ्यात कोणती मोठी घोषणा?

Kukadi River Pollution | कुकडी नदीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर ; जलपर्णी ठरतेय डोकेदुखी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें