AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भरदिवसा बिल्डरच्या घरावर गोळीबार; अंबरनाथ हादरलं

अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! भरदिवसा बिल्डरच्या घरावर गोळीबार; अंबरनाथ हादरलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2025 | 3:25 PM
Share

अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते.  त्यांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून पळ काढला. अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदन हे घर आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडत तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

तपासाला सुरुवात

अंबरनाथमध्ये ही घटना घडली आहे, बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्या दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला, या घटनेनं खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिवाजीनगर पोलीस तसेच क्राईम ब्रँचच्या टीमनं घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी कडून देण्यात आली आहे.

दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे, हे हल्लेखोर नेमके कोण होते? गोळीबार करण्यामागचा त्यांचा नेमका उद्देश काय होता? हे अजून समोर आलेलं नाही, पोलिसांकडून या घटनेसंदर्भात तपास सुरू आहे.

यापूर्वी देखील चेंबूरमध्ये अशीच एक घटना घडली होती, एका बिल्डरच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. सदरुद्दीन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव होतं. या घटनेत ते जखमी झाले होते.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा