
मुंबई : कबुतरांना खायला घातल्या प्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहीम पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल झालाय. माहिमच्या एल. जे रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा अनोळखी चारचाकी चालकावर आरोप आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 223, 270 आणि 271 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या मनाई नंतरही दादरच्या कबूतरखान्यात पक्ष्यांना खाद्य घातलं जात असल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त करत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिकेला दिली आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबुतर खान्यावर कारवाईला सुरूवात मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलीये. मात्र, स्थानिक नागरिकांकडून याला विरोध केला जातोय. कबुतर खाना तोडायला पालिका का घाई करतेय? कबुतरानी जायचं कुठे? न्यायालयाच्या आदेशाने कारवाई होत असेल तर दादर स्थानकाच्या बाहेर फेरीवाले बसू देऊ नका
हे देखील सांगितलं आहे, त्यावर का कारवाई केली जात नाही, असे नागरिकांनी म्हटले आहे.
मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतर खाना येथे पक्षांना खाद्य टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करायला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सकाळपासून तैनात असून पोलीस देखील याठिकाणी कारवाई करण्यासाठी उपस्थित आहेत. या कबुतर खाण्यात अनेक कबुतर ही वयस्कर आहेत त्यांना खायला मिळाल नाही तर ते रस्त्यावर येऊन गाडी खाली मरून जातात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
यासोबतच दादर कबूतर खान्यावर जाळी टाकण्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध केला. रात्री स्थानिकांनी विरोध केल्यानंतर दादर कबूतर खाना या परिसरात अजूनही मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. रात्री महापालिका अधिकाऱ्यांना पाहून नागरिकांनी रस्त्यावर उतरत विरोध केला होता. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पोलिसांशी चर्चा करावी व आम्हाला कबूतर खाण्याची व्यवस्था करण्यासाठी वेळ द्यावा नागरिकांची मागणी.
तसेच एवढ्या रात्री कारवाई करायला का आलात नागरिकांचा सवाल. दादर कबूतर खाना येथे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी रात्री 11 नंतर पोहचले आणि त्यांचे म्हणजे होते की, वर जाळी टाकल्याने कबूतर येणार नाहीत आणि कोणी खायला देखील देऊ शकणार नाही. मात्र तिथे आलेल्या अधिकाऱ्यांना पाहून स्थानिक नागरिकांनी आणि जीवदया प्रेमींनी रस्त्याववर येऊन याला विरोध दर्शवला.