AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; पाचोरा येथे फळ विक्रेता चक्कर येऊन कोसळला

राज्यातील अनेक भागात उष्णतेने कहर माजला असून जळगावातील पाचोरा येथे एका फळ विक्रेत्याचा उष्माघाताने मृ्त्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; पाचोरा येथे फळ विक्रेता चक्कर येऊन कोसळला
First Heatstroke Fatality in Jalgaon
| Updated on: Apr 30, 2026 | 5:20 PM
Share

राज्यासह देशात यंदाचा उन्हाळा अधिकच दाहक वाटत आहे. अनेक ठिकाणी तापमानाने विक्रम मोडले आहेत. जळगाव जिल्ह्यात उन्हाच्या काहीलीने पाचोरा येथे एका तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेला तरुण हा फळ विक्रेता असून त्याला अचानक भोवळ येऊन तो खाली कोसळला आणि पाचारो ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले आहे.

पाचोरा येथे उष्माघाताने एक तरुण आनंदा नथ्थू भोई ( वय ३४, रा. जवाहर हाऊसिंग सोसायटी, बाहेरपुरा) या तरुणाला भोवळ आली आणि तो खाली कोसळला.आनंदा भोई हा तरुण छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळविक्री करत असताना अचानक त्यांना भोवळ आली आणि तो खाली कोसळला. त्याला तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार आनंद भोई यांच्यात उष्माघाताची लक्षणे आढळून आली असली तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे.

आनंदा नथ्थू भोई असे ३४ वर्षीय उष्माघाताने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान उष्माघातापासून बचाव साठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी दुपारचे वेळी बाहेर पडू नये ,असे आव्हान जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करावी अशा देखील सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या आहेत

पिंपरी-चिंचवड येथील सरकारी रुग्णालयात केळवण जेवण

पिंपरी-चिंचवड येथील सरकारी रुग्णालयात ‘केळवण जेवण’ आयोजन केल्याचे उघड झाल्याने यावर चौकशी करण्याची मागणी होत आहे. या केळवण जेवणाला महानगरपालिकेने परवानगी दिली होती का? असा सवाल केला जात आहे. रुग्णालय प्रशासशी संपर्क साधला असता केळवण जेवण सरकारी जागेत करणे चुकीचे असून संबंधितावर कारवाईचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे डॉ. अलवी नासिर यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये नुकतेच ‘केळवण जेवण’ आयोजित करण्यात आल्याची घटनासमोर आली आहे. या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील संपूर्ण कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता. विशेष म्हणजे महिला तसेच पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिजामाता हॉस्पिटल हे महानगरपालिकेचे सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा देणारे सरकारी रुग्णालय आहे. अशा ठिकाणी वैयक्तिक किंवा सामाजिक स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!