AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा होण्यास सुरुवात, अनेक महिलांच्या बँक खात्यात 3 हजार जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिलांच्या बँक खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा होण्यास सुरुवात, अनेक महिलांच्या बँक खात्यात 3 हजार जमा
ladki bahin yojna
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 14, 2024 | 8:38 PM
Share

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. या योजनेचा पहिला हफ्ता मुंबईतील महिलेला मिळाला आहे. मुंबईतील वरळी येथील महिलेच्या बँक अकाउंटमध्ये पहिल्या हफ्ता जमा झाला आहे. विशेष म्हणजे 9 ऑगस्टला या महिलेच्या बँक खात्यात 1 रुपया चाचपणीसाठी जमा झाले होते. यानंतर आज 14 ऑगस्टला 3 हजार रुपयांचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. लातूर, धाराशिवमध्येही महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज भरले होते त्यांना दोन महिन्यांचे 3 हजार रुपये देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे सिंधुदुर्गातही अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गातही लाडक्या बहीण योजनेचा पहिला हफ्ता अनेक बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकदम दोन हफ्त्याचे तीन हजार खात्यात जमा झाले आहेत. योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाल्यानंतर कणकवलीत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या 17 ऑगस्टला 1 कोटी 2 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. याआधी काही महिलांच्या बँक खात्यात ट्रायल म्हणून 1 रुपये जमा करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे जमा केले जात आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

लाडकी बहिण योजनेत महत्त्वाची अपडेट्स

  • ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालणार
  • ३१ ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत १ कोटी ३५ लाभार्थ्यांची यादी तयार
  • 1 कोटी 2 लाख लाभार्थ्यांना पहिला हफ्ता 17 ऑगस्टाला
  • 10 दिवसांनी उर्वरित लाभार्थ्यांनाही मिळणार हफ्ता
  • पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत.
  • लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु
  • १७ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, मंत्री आदिती तटकरेंचं आवाहन

Follow Us
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात