AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

समृद्धी महामार्ग आणि मुंबई- गोवा महामार्ग, नाशिक- सटाणा तसेच जळगाव अशा राज्यात विविध चार भागात झालेल्या अपघातात एकूण पाच जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहे.

समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
nashik accident
| Updated on: Jun 23, 2026 | 5:20 PM
Share

समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळ ट्रकला एका फॉर्च्युनर कारने धडक दिल्याने एका दाम्पत्याचा जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत. मुंबई गोवा मार्गावर थारचा चक्काचूर होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे राज्यात चार ठिकाणी झालेल्या विविध अपघातात एकूण पाच जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. पहिल्या अपघातात समृद्धी महामार्गावर डॉक्टर सय्यद आसिफ सय्यद उमर हे त्यांची पत्नी गुलीस्तानबी आणि कुटुंबासह नागपूरवरून संभाजीनगरला जात असताना त्यांची फॉर्च्युनरची ट्रकला धडक झाली. या अपघातात या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या तिघांना जालनात येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

जळगावच्या धरणगाव तालुक्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पाळधीनजीक सावदा-रिंगणगाव रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वया – ३८ वय) , चेतन पाटील (वया – ३५ )आणि प्रदीप उखा निकम ( वय ४० ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात एका दुचाकीवर मागे बसलेले बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

थार कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात, दोन महिला ठार

थार कारने गोव्याहून कणकवली येथे जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात थार कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या धडकून दोन महिलांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. भरधाव थार कार ( जीए-०३-एएम-८४७८ क्रमांक ) हायवेवरून नेमळे मार्गावरून कणकवली येथे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने थारकारचा कारचा चक्काचूर झाला.

वाहनाचा वेग जास्त असल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन धडकल्याने हा अपघात घडला. या अपघातात श्रीमती नानोडकर (वय ४३, रा‌. गिरी-गोवा ), विलासिनी सातार्डेकर (वय ५३, रा‌. भिरवंडे-कणकवली) गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांना मृत घोषीत करण्यात आले. चालक सनी नानोडकर (वय ४०, रा‌‌. गिरी गोवा), उज्वला कांबळी (वय ५०, रा. गिरी गोवा), पांडुरंग नानोडकर ( वय ६५, रा. गिरी गोवा ) हे जखमी असून उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना गोवा- बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

सटाणा येथील हरणबारी – मुल्हेर रस्त्यावर भीषण अपघात

नाशिकच्या सटाणा येथील हरणबारी – मुल्हेर रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. टिप्पर आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने या जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!