मोठी बातमी! अनिल देशमुखांचा गंभीर आरोप, फॉरेन्सिक रिपोर्टबद्दल केला धक्कादायक खुलासा

Anil Deshmukh attack : साधारणपणे दहा महिन्यांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्ला राजकीय वळण देण्यात आले. मात्र, आता देशमुखांनी फॉरेन्सिक रिपोर्टबद्दल मोठा दावा केला आहे.

मोठी बातमी! अनिल देशमुखांचा गंभीर आरोप, फॉरेन्सिक रिपोर्टबद्दल केला धक्कादायक खुलासा
Anil Deshmukh
| Updated on: Oct 01, 2025 | 9:41 AM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यादरम्यान त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. आता नुकताच अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केले आहेत. देशमुखांनी म्हटले की,  फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले, एका इसमाने गाडीवर लहान दगड मारला, एका इसमाने मोठा दगड मारला. त्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीची काच फुटून जखम अनिल देशमुखांच्या कपाळाला झाली. ही घटना झाल्यापासून सुरूवातीपासून याला राजकीय रंग देण्यात आला. मी लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट हा जनतेपुढे आणणार आहे. क्लोजर रिपोर्टनंतर ते चांगलेच संतापल्याचे दिसले.

अनिल देशमुखांनी पुढे म्हटले की, ही घटना झाल्यानंतर लगेचच एसपींनी कोणत्याही रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावा पोटी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटले की, ही जी घटना आहे ती, सलीम जावेदची स्टोरी आहे. सुरूवातीपासूनच या घटनेला राजकीय रंग देण्यात आला. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, दोन माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची व्यवस्थित चाैकशी करून त्या दोन माणसांना पकडायला पाहिजे होते.

माझ्यावर हल्लाच असे फॉरेन्सिकने सांगितले आहे. आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट आला आहे, त्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढे करू असे अनिल देशमुखांनी म्हटले. आरोपी सापडले नाहीत, यासंदर्भात रिपोर्ट द्यायला पाहिजे होता. मी फॉरेन्सिक रिपोर्ट पाहिला आहे. मी गृहमंत्री होतो..आम्हालाही मिळतात कागदं..पोलिस खात्याकडूनच मला तो रिपोर्ट बघायला मिळाला आहे.

फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सरळ सरळ म्हटले की, अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड मारल्याने विशेष म्हणजे मोठा दगड तर दहा किलोचा होता. रस्त्यावर वळण मोठे असल्याने गाडीचा वेग अत्यंत कमी होता. दगडामुळे काच फुटली आणि अनिल देशमुखांच्या कपाळाला जखम झाली म्हटलंय. अनिल देशमुखांनी या हल्ल्यानंतर आता सरकारवर आरोप केली आहेत. लवकरच मी हा रिपोर्ट दाखवेल, असेही अनिल देशमुखांनी यावेळी म्हटले आहे.