AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटात पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं घडणार? नाराज नेता अ‍ॅक्शन मोडमध्ये

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेता पक्षावर नाराज असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलावण्यात आली होती.

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटात पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं घडणार? नाराज नेता अ‍ॅक्शन मोडमध्ये
sunetra pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 9:57 PM
Share

सध्या राज्यात ऑपरेश तुतारी आणि ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेता पक्षावर नाराज असून, या सर्व पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलावण्यात आली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं होतं. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील पक्षांना गळती लागल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यातील काही जण भाजपमध्ये देखील दाखल झाले.

दरम्यान पक्षाला लागलेली गळती थांबवणं हे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटापुढे मोठं आव्हान असतानाच त्यामध्ये ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी यांची देखील चर्चा सुरू झाली मात्र आता जी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेता राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ सोडण्याची शक्यता आहे.

धुळे शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी आमदार फारुक शहा पक्षावर नाराज आहेत. पक्षात वरिष्ठांकडून कोणतीही मदत तसेच विकास काम होत नसल्याने फारुक शहा पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून,  राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत माजी आमदार फारुक शहा यांनी बैठक घेतली आहे. आठवड्याभरात पक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास राष्ट्रवादीच्या 9 नगरसेवक तसेच  कार्यकर्त्यांसह माजी आमदार फारुक शहा पक्षाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फारुक शहा पुढच्या आठवड्यात आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?