चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात वीज कोसळून चौघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 4 महिला ठार

या दुर्घटनेत हिरावती झाडे (वय 45), पार्वता झाडे (वय 60), मधुमती झाडे (वय 20), रिना गजभिये (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात वीज कोसळून चौघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 4 महिला ठार
निलेश डाहाट

| Edited By: महादेव कांबळे

Jul 30, 2022 | 7:22 PM

चंद्रपूरः चंद्रपूर जिल्ह्यात सध्या जोरदारर पाऊस सुरू आहे, जिल्ह्यातील अनेक ठिकाणाी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिसरातील अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. आजही जोरदार पाऊस सुरु असताना वायगाव (भोयर) (Vaigaon, Bhoyer) या गावातील शेती परिसरातही मुसळधार पाऊस सुरू होता, पाऊस सुरू झाल्याने शेतात गेलेली माणसं घरी परतत असताना अचानक वीज कोसळून (Lightning Strike) त्यामध्ये चार जण जागीच ठार (Four Death) झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वायगाव (भोयर) येथील शेतकरी कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाला असल्याने कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला असून शेगाव पोलीस या घटनेचा पंचनामा करत आहेत.

घरी परतत असताना काळाचा घाला

शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वायगाव (भोयर) या गावातल्या शेत शिवारात गेलेली माणसं जोरदार पाऊस सुरु झाल्याने शेतातील माणसे घराकडे परतत होती. त्यावेळी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. त्यावेळी शेतातील महिला व मुली घराकडे परत जात असतानाच अचानक शेतातच वीज कोसळली. त्यामध्ये हिरावती झाडे (वय 45), पार्वता झाडे (वय 60), मधुमती झाडे (वय 20), रिना गजभिये (वय 20) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

एकाच घरातील चार महिला

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू त्यामुळे शेतीसह अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे परिसरातील अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे. जोरदार पाऊस सुरू असतानाच शेतकरी महिला शेती कामासाठी शेतीशिवारात कामाला गेल्या होत्या. शेतात गेल्यानंतर काही वेळानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे शेतातील महिला घरी परतत असताना अचानक वीज कोसळून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या घटनेची नोंद शेगाव पोलीस स्थानकात झाली असून पंचनामा करण्यात येत आहे. अचानक एकाच कुटुंबातील चार महिलांवर वीज कोसळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें