AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्न व औषध मंत्री धर्मराव आत्राम यांना नक्षलवाद्यांची पाचव्यांदा धमकी

अन्न व औषध मंत्री धर्मराव आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून पुन्हा धमकी मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यात आत्राम यांना पाचव्यांदा धमकीचे पत्र मिळाले आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सुरू असलेल्या लोह खनिज प्रकल्पावरून राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री अत्राम यांना ही धमकी देण्यात आली.

अन्न व औषध मंत्री धर्मराव आत्राम यांना नक्षलवाद्यांची पाचव्यांदा धमकी
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 27, 2023 | 12:24 PM
Share

गडचिरोली | 27 नोव्हेंबर 2023 : अन्न व औषध मंत्री धर्मराव आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून पुन्हा धमकी मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यात आत्राम यांना पाचव्यांदा धमकीचे पत्र मिळाले आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सुरू असलेल्या लोह खनिज प्रकल्पावरून राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री अत्राम यांना ही धमकी देण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीही त्यांना धमकी देणारं एक पत्रक आढळलल्याने खळबळ उडाली होती.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सुरू असलेला लोह खनिज प्रकल्प आणि नवीन सुरू होणाऱ्या पाच लोह खनिज प्रकल्पाच्या विरोधात नक्षलवादी नेहमीच पत्रकबजी करत असतात. या धमकीनंतर अत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचा गडचिरोली दौरा झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी तीन लोकांची हत्या केली. एक हत्या ही मुख्यमंत्री आले त्या दिवशी झाली तर त्यानंतरही नक्षलवाद्यांनी दोन जणांची हत्या केली. गडचिरोली जिल्ह्यात मायनिंग सुरू केल्याने जे लोक त्या मायनिंगच्या विरोधात आहे ते लोक धमकी देतात. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सोडणार नाही. ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करू. लोकांनी आम्हाला विकासासाठी निवडून दिलेलं आहे त्यामुळे आम्ही काम करणे बंद करणार नाही, असं आत्राम म्हणाले. लोकांचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. कितीही धमकी येऊ दे, आम्ही आमचं काम थांबवणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

मला आता ही पाचव्यांदा धमकी मिळाली आहे. यासंदर्भात गृहविभागाला जी कारवाई करायची असेल, ते ती कारवाई करतील. मी माझं स्वतःचं संरक्षण करेन, असं ते म्हणाले.

यापूर्वीही मिळाली होती धमकी

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांना यापूर्वीही अनेक वेळा धमकी देण्यात आली. सप्टेंबर महिन्यात, तसेच त्या आधीही आत्राम यांना पत्राद्नारे धमकी देण्यात आली होती. सूरजागड येथे गेल्या काही वर्षांपासून लोह खनिजाचे उत्खनन सुरू आहे. मात्र नक्षलवाद्यांचा त्याला सुरूवातीपासूनच विरोध आहेत. यासाठी मंत्री आत्राम हे जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी देणारे पत्र सप्टेंबर महिन्यात गट्टा परिसरात आढळले होते. त्यानंतर त्यांना आता पुन्हा धमकी मिळाली आहे.

Follow Us
'विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही'
विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद