गणेशोत्सवाच्या प्रसादावर FDA ची बारीक नजर, तुकाराम मुंढे यांच्या बैठकीत..
राज्यात गणेशोत्सव तोंडावर आहेत. त्यापूर्वीच एफडीएने कडक नियमावली तयार केली. गणेश मंडळांच्या प्रसादांकडेही एफडीएची कडक नजर असणार आहे. मात्र, याला विरोध गणेश मंडळांकडून केला जात आहे.

तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. जोरदार छापेमारी राज्यभरात सुरू आहे. हॉटेलचालकांचे धाबे दणाणली आहेत. सर्वत्र जोरदार कारवाई केली जात आहे. हेच नाही तर लग्नाचे जेवण आणि कोणत्याही पंगती करण्यापूर्वी एफडीएची परवानगी घ्यावी लागणार आहे. भंडाऱ्याच्या जेवणाकडेही एफडीएची नजर असणार. गणेशोत्सवात प्रसाद वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादावर एफडीएची नजर असणार आहे. भक्तांना योग्य महाप्रसाद द्यायचा यावर बैठक होणार आहे. एफडीएच्या बैठकीला समन्वय समितीचा आक्षेप. महाप्रसादाची एसओपी ठरवण्यासाठी उद्या बैठक होईल. गणपती उत्सव तोंडावर आला असताना बैठक का घेताय? या आधीचं एफडीएला बैठक घेण्यासाठी पत्र दिलं होतं. कमी वेळात प्रसादासाठी कंत्राटदार नेमण्यापासून सर्व गोष्टी कश्या करणार? गणेशोत्सव समन्वय समितीने पत्रकार परिषद घेत आपला आक्षेप मांडला आहे.
नरेश दहिबावकर अध्यक्ष मुंबई गणेशोत्सव समन्वय समिती यांनी म्हटले की, गणेशोत्सवाला पाच दिवस शिल्लक असताना मंडळांना FDA ने बैठकीसाठी बोलावलं, मंडळ जातील पण मी जाणार नाही. भक्तांना कोणता महाप्रसाद द्यायचा, महाप्रसादाची काय एसओपी असावी, यासाठी ऐन गणेशोत्सवात तोंडावर बैठक लावली, नियम लवचिक ठेवावे, सक्ती करू नये ही भूमिका …ऐन तोंडावर कांट्रॅक्टर कुठून नेमायचा हा प्रश्न आहे.
गणपती बाप्पाच्या मूर्तीची उंची बाबत निर्णय पालिका व शासन यांनी निर्णय घ्यावा, गणपती समन्वय समितीची भूमिका आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीची रूप बदलली आहे, याबाबत समन्वय समितीने नाराजी व्यक्त केलीय. झेनझी आमच्यासोबत यावेत ही आमची भूमिका आहे. पण ते पुढाकार घेत नाहीत त्यांनी तो घ्यायला पाहिजे, असेही यादरम्यान त्यांनी म्हटले.
एफडीएकडून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, भंडारा करण्यापूर्वी एफडीएची परवानगी घ्यावीच लागणार आहे. एफडीएची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही कार्यक्रम केले जाऊ शकत नाहीत, जिथे आचारी येतील, त्या कार्यक्रमासाठी जेवणाची परवानगी एफडीएची घ्यावी लागणार आहे.
