AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil : अपघातानंतर जखमीच्या कुटुंबियांची भेट का घेतली नाही ? गौतमी पाटीलने स्पष्टच सांगितलं

पुण्यातील गौतमी पाटीलच्या कार अपघातावरुन निर्माण झालेल्या वादावर तिने अखेर प्रतिक्रिया दिली आहे. अपघातावेळी आपण कारमध्ये नव्हतो, पोलिसांचे ते स्पष्ट आहे. राजकीय हेतूने आपल्याला लक्ष्य केले जात असून, पीडित कुटुंबाला मदत देऊ केली होती पण गुन्हा दाखल असल्याने त्यांनी ती स्वीकारली नाही असे गौतमीने सांगितले.

Gautami Patil : अपघातानंतर जखमीच्या कुटुंबियांची भेट का घेतली नाही ? गौतमी पाटीलने स्पष्टच सांगितलं
गौतमी पाटीलने मांडली भूमिका
| Updated on: Oct 08, 2025 | 9:55 AM
Share

पुण्यात 30 सप्टेंबरच्या रात्री वडगाव बुद्रुक परिसरात झालेला एका कार आणि रिक्षाचा अपघात चांगलाच गाजतोय, त्याचं कारण म्हणजे ज्या कारची रिक्षाला धडक बसून हा अपघात झाला ती कार आहे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिची. या अपघातात रिक्षाचालक जबर जखमी झाला मात्र कारचालक त्याच्या मदतीला गेला नाही उलट तिथून पळून गेला. नंतर ती कारही तिथून हलवण्यात आली. जखमी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांना उपचारांसाठी स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं. यानंतर नृत्यांगना गौतमी पाटलीविरोधात रोषाचे वातावरण निर्माण झाले, तिच्यावर टीका झाली, अटकेची मागणी झाली. जखमीच्या उपचारासाठी तिने पुढाकार घ्यायला पाहिजे, पण ती पुढे आलीच नाही असं म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली. जखमी रिक्षाचालकाच्या मुलीनेही गौतमीवर बरीच टीका केली.

आता या सर्व मुद्यांवर गौतमीने माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत तिची बाजू मांडली आहे. जखमी रिक्षाचलकाच्या कुटुंबाला आपण भेटणार नाही, असंही तिने सांगितलं, मात्र त्यामागचं कारण स्पष्ट करताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.

नाही त्या गोष्टींवरून माझ्यावर आरोप का  ?

ज्या दिवशी तो अपघात झाला तेव्हा मी कारमध्ये नव्हती. पोलिसांनी हे स्पष्ट केलंय, सीसीटीव्हीमध्येही ते अगदी स्पष्ट दिसलं आहे तरीही लोक मला ट्रोल करत आहेत असं गौतमी म्हणाली. या विषयावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. नाही त्या गोष्टींवरून माझ्या वर का आरोप केले जात आहेत ? यामागचं कारण काय ते मला माहीत नाही. पण ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये, त्यात मला पाडू नका असं तिने स्पष्ट शब्दांत सुनावलं.

म्हणून जखमीच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही 

ज्या वेळी अपघात झाला, तेव्हा मी गाडीत उपस्थित नव्हते. मात्र अपघातनंतर जखमी, पीडित कुटुंब होतं, त्यांची भेट घेण्यासाठी माझे भाऊ गेले होते. त्यांनी त्यांच्यासमोर (पीडित कुटुंबासमोर) मदतीचा हात पुढे केला होता, पण गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांनी आम्ही देऊ केलेली मदत नाकारली. म्हणून मी तिथून परत आले असं गौतमीने सांगितले.  जे सुरू आहे कायदेशीररित्या, ते होऊ  दे असंही ती म्हणाली.

Gautami Patil : मला अजून ट्रोल करा.. गौतमी पाटीलने सोडलं मौन ! अपघाताबद्दल म्हणाली…

अपघातानंतर आम्हाला गौतमी पाटीलने मदत करायला हवी होती, पण कोणीच आलं नाही असा आरोप पीडिताच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यावर गौतमीला प्रश्न विचारण्यात आला असता तिने सडेतोड उत्तर दिलं. ‘ माझ्यावर आरोप करायला सगळे बसले आहेत. मी प्रत्येक वेळेस ट्रोल होत असते. सुरूवातीपासून ते आत्तापर्यंत मी ट्रोलच होत आले आहे. जो तो येतो, बोलून जातो. आता यापुढे जे होईल ते सगळं न्यायाने, व्यवस्थित होईल’ असं गौतमी सुनावलं.

( या प्रकरणात ) माझं पोलिसांना पूर्णपणे सहकार्य आहे, जे कोणी दोषी असतील त्यांन नक्की शिक्षा मिळावी, माझा पूर्णपणे सपोर्ट आहे या गोष्टीला असं गौतमीने सांगितलं. अपघातानंतर मी माझ्या भावांना तिथे पाठवलं, पण तिथे जसे रिप्लाय आले, त्या वरून मला वाटलं की, मी असा विचार केला की मी तिथे जाऊनदेखील काहीही उपयोग नाही, म्हणून मी तिथे ( जखमी पीडित कुटुंबियांच्या घरी) गेले नाही असंही गौतमी म्हणाली. मी त्यांच्यासमोर मदतीचा हात पुढे केला होता, याचा पुनरुच्चारही गौतमीने केला. याप्रकरणात पुढे काय होतं, पोलिस काय कारवाई करतील हे पाहणं महत्वाचं ठरेल

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.