Gautami Patil : गौतमी ताईला ओपन चॅलेंज देतो…नाहीतर त्यांनी बिहारमध्ये जावे…

Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या बाबतीत अनेक वाद सुरु झाले आहे. कमी कालवधीत गौतमी पाटील चांगल्याच प्रसिद्ध झाल्या. यामुळे गौतमी पाटीलच्या टीकाकारांची संख्या वाढलीय. त्याचवेळी छोटा पुढारींनी काही बाबींचे समर्थन करत काही ठिकाणी विरोध केलाय.

Gautami Patil : गौतमी ताईला ओपन चॅलेंज देतो...नाहीतर त्यांनी बिहारमध्ये जावे...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 3:05 PM

स्वप्नील उमप, अमरावती ब्रेकिंग : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या संदर्भात विविध वाद निर्माण केले जात आहे. कधी तिच्या मानधनावरुन वाद केला जातो, तर कोणी तिच्या आडनावावरुन वाद सुरु केला आहे. तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्याची मागणी केली जातेय..  या सर्व पार्श्वभूमीवर आता गौतमी पाटील यांना बदल करावा लागणार आहे, असे मत घनश्याम दरोडे यांनी केले…अन्यथा त्यांनी बिहारमध्ये जावे, असे आव्हानही दिले.

काय म्हणाले छोटा पुढारी

छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध झालेले धनश्याम दरोडे म्हणाले की, महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर महाराष्ट्राची संस्कृती राखली पाहिजे. गौतमी पाटील यांनी पाटील आडनाव लावावे. त्याला माझा विरोध नाही तर त्या ज्या पद्धतीने अदा करतात, त्याला माझा विरोध आहे. पाटील आडनाव लावण्याचा ज्याला त्याला पूर्ण अधिकार आहे. गौतमी पाटील यांना आडनावरून कोणी विरोध करू नये, आपले अधिकार आपण ठरू शकतो, असे छोटा पुढारी यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

ghanshyam-darode

तर मी पाठीमागे उभा असेल

गौतमी पाटील यांचं पाटील आडनाव काढण्याचा कोणी प्रयत्न कोणी करत असेल तर मी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे मी उभा असेल, असे घनश्याम दरोडे यांनी म्हटलंय. 9 तारखेनंतर मी गौतमी पाटील यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्राच्या वतीने त्यांना समजून सांगणार आहे. त्यांना बदल करायला सांगणार आहे. महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर महाराष्ट्राची संस्कृती एक राहिली पाहिजे, असे छोटा पुढारी यांनी म्हटले.

तेव्हा महाराष्ट्राची संस्कृती कळेल

मी गौतमी पाटील ओपन चॅलेंज करतो त्यांनी आमचा मुसंडी सिनेमा पाहावा, तेव्हा तुम्हाला कळेल महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. गौतमी पाटील यांना बोलण्यात काही अर्थ राहिला नाही, बोलून काही त्या प्रतिसाद देत नाही. आता नऊ जून नंतर मी त्यांची भेट घेणार आहे.

नाहीतर ताईंनी बिहारमध्ये जावे

आता ताईला समजून सांगणे गरजेचे आहे, नाहीतर मी ताईला ओपन चॅलेंज देतो त्यांनी बिहारमध्ये जावं, असे धनश्याम दरोडे यांनी म्हटले. तुम्ही बदल करणार नसाल तर महाराष्ट्रात तुम्हाला थारा नाही. गौतमी पाटील यांची महाराष्ट्रात जास्त दिवस हवा राहणार नाही. कारण तुम्ही पोरांना वेगळ्या वर्णाला लावत आहे, वाईट वळण लावत आहे.

हे ही वाचा

…तेव्हा गौतमीला दोन वेळचे जेवण द्यायला कोणी गेले होते का? अमोल कोल्हे यांनी त्या लोकांना फटकारले

Non Stop LIVE Update
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.