Gautami Patil : गौतमी पाटीलचं काही खरं नाही, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय? पुणे पोलिसांनी उचललं मोठ पाऊल

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील पुण्यातील अपघातामुळे चर्चेत आहे. तिच्या गाडीने रिक्षाला धडक दिल्याने चालक जखमी झाला, आणि आता गौतमीच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मोठं पाऊल उचललं आहे, ज्यामुळे गौतमीच्या अडचणी वाढल्या आहेत.

Gautami Patil : गौतमी पाटीलचं काही खरं नाही, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय? पुणे पोलिसांनी उचललं मोठ पाऊल
गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ
| Updated on: Oct 04, 2025 | 11:40 AM

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटली सध्या बरीच चर्चेत आली आहे. पण यावेळी ती तिच्या नृत्यामुळे नव्हे तर एका अपघातामुळे. पुण्यात झालेल्या अपघातानंतर आता गौतमीला थेट अटक करण्याची मागणी केली जात असून हे प्रकरण चांगलचं तापलं आहे. त्यातच आता पुणे पोलिसांनी एक मोठ पाऊल उचलल्यामुळे गौतमीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गौतमीला अटक केली जाणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

30 सप्टेंबर रोजी पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक भागात एक अपघात झाला, त्यामध्ये कारने रिक्षाला धडक दिली आणि वाहनचालक पळून गेला. तर रिक्षा ड्रायव्हर जबर जखमी झाला आहे. ज्या कारने धडक दिली ती गौतमी पाटील हिची होती, आणि यामुळेच आता हे प्रकरण तापलंय. याच प्रकरणी पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.

रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले

या अपघात प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच गौतमी पाटीलची कार जो चालवत होता त्या ड्रायव्हरने अमली पदार्थ किंवा मद्याचे सेवन केले होते का याचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्याचा भाग म्हणून गाडी चालवणाऱ्या इसमाच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील आणि त्यावरच या अपघात प्रकरणाच्या तपासाची पुढील दिशा ठरेल.

सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू

दरम्यान 30 तारखेला झालेल्या या अपघातानंतर पोलिसांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिलालही जबाब देण्यासाठी नोटीस पाठवली असून हजर राहण्यास बजावण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर ज्या रात्री अपघात घडला त्या वेळचं CCTV फुटेज देखील पोलिसांच्या हाथी लागलं असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्या फुटेजमध्ये काय सापडतं हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 2 टीम तपासकामी रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच अपघातावेळी गौतमी पाटील ही त्या कारमध्ये होती का, तिचं लोकेशन कायं होतं याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे, त्यामुळे आता गौतमीच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

30 सप्टेंबरच्या रात्री वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला गौतमी पाटीलच्या भरधाव कारने धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालकाला सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले. कारचालक मात्र मदतीसाठी न थांबता तसाच पळून गेला, नंतर ती कारही तेथून हटवण्यात आली. मात्र रिक्षाचालक मरगळे यांना बराच वेळ मदत मिळाली नाही. अखेर बऱ्याच वेळाने स्थानिकांनी त्यांना उठवत उपचारांसाठी रुग्णालयात नेले. अपघात झाला ती कार गौतमीच्या नावे असून आता याप्रकरणात अधिक तपास सुरू आहे. गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी सध्या जोर धरू लागलीये.