AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबमध्ये निवडणुका असल्यामुळेच गिरीश महाजन… निवृत्त कर्नलचा हल्लाबोल; त्या विधानाचा घेतला समाचार

Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असा उल्लेख केला होता. यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. आता एका निवृत्त कर्नलने महाजन यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

पंजाबमध्ये निवडणुका असल्यामुळेच गिरीश महाजन... निवृत्त कर्नलचा हल्लाबोल; त्या विधानाचा घेतला समाचार
Girish Mahajan Operation Blue StarImage Credit source: Google
| Updated on: Jun 10, 2026 | 7:45 PM
Share

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन सध्या वादात सापडले आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42 व्या स्मृतीदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असा उल्लेख केला होता. तसेच या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याशी लढणाऱ्या विभाजनवाद्यांचा उल्लेख शहीद असा केला होता. यामुळे आता राजकारण तापले आहे. या सर्व प्रकरणावर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी भाष्य केले आहे. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

पाकिस्तान अमृतसरवर हल्ला करणार होता…

गिरीश महाजन यांच्या विधानावर बोलताना अभय पटवर्धन यांनी म्हटले की, ‘हे केवळ वादग्रस्त विधान नसून दुर्दैवी विधान आहे. गिरीश महाजन हे महाराष्ट्राचे मंत्री आहे, त्यांना माहीत असायला पाहिजे, त्या काळामध्ये बिंद्रावाले वाले हे खलिस्तान डिक्लेअर करण्याच्या तयारीत होते. त्यांनी खलिस्तानची करन्सी छापली होती, पासपोर्ट छापले होते. पत्रक आणि लेटरहेड छापले होते, सगळे तिथे होतं. आम्ही लोकांनी तिथे यासाठी कारवाई केली की, पाकिस्तानचा हा प्लान होता बिंद्रावाले सुवर्ण मंदिरातून स्वातंत्र्याची घोषणा करतील आणि त्यावेळी पाकिस्तान अमृतसरवर हल्ला करेल आणि ताब्यात घेईल. पठाणकोट मध्ये सुद्धा हल्ला करण्याचा प्लॅन होता.’

सरकारने आपलं कर्तव्य पार पाडलं…

पटवर्धन पुढे बोलताना म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या प्लॅनची माहिती भारत सरकारला कळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये त्या काळात बिंद्रावाले आणि साबिद सिंग हे मारले गेले त्याचं आम्हालाही दुःख झालं. साबिदसिंग हा आमच्यासोबत ब्रिगेडर असताना होता. त्याच्याकडे ट्रेनिंग देण्याचं काम होतं मात्र तो नंतर बिंद्रावाला सोबत गेला. ते लोक किती चांगले असले तरी त्यांनी देशाविरुद्ध देशापासून वेगळे होण्याची इच्छा व्यक्त विरोधात कार्य केले त्यामुळे अशा लोकांना मारणे हे देशाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य सरकारने पार पाडलं.’

पंजाबमध्ये निवडणुका…

पुढे पटवर्धन म्हणाले की, ‘आम्ही पण गोल्डन टेम्पल मध्ये गेलो होतो, आमच्याकडे त्यांच्यासोबत लढण्याचे साहित्य कमी होते. बिंद्रावाले आणि खलिस्तानी लोकांनी एक मोमेंट तयार केली. त्यादिवशी बिंद्रावाल्यांचा शहीद दिवस म्हणून साजरा करतात, त्यावेळी कोणीही तिथे जात नाही. तिथे फक्त अकाली दलचे लोक जातात. यावेळी महाजन तिथे का गेले हे मला माहित नाही. कदाचित पुढच्या वर्षी पंजाबमध्ये इलेक्शन व्हायचं आहे, त्याचसाठी गेले असावे. त्यांचा हेतू असावा बीजेपीला तिथे वर्चस्व मिळावं म्हणून ते कदाचित गेले असतील. सहानुभूती दाखवून मत घेण्याकरता गेले असतील. मला राजकारणातलं काही कळत नाहीस पण मी सांगू शकतो त्यांनी जे केलं, त्यामुळे आमच्या सैनिकांचा अपमान झाला आहे आणि त्या विधानाचा मी धिक्कार करतो.’

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला