भाजपाला सर्वात मोठा धक्का, निवडणूक जिंकली पण…महाविकास आघाडीच्या निर्णयामुळे मोठा पेच!

भाजपाच्या जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आता मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत.

भाजपाला सर्वात मोठा धक्का, निवडणूक जिंकली पण...महाविकास आघाडीच्या निर्णयामुळे मोठा पेच!
girish mahajan and sadhana mahajan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2025 | 6:35 PM

Jamner Local Body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर मोठे डावपेच आखले जात आहेत. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी मात्र काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवड बिनविरोध झाली होती. आता मात्र ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध झाली होती. आता मात्र त्यांच्या निवडीविरोधात आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीने थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठवण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमकं काय घडलंय?

जळगावच्या जामनेर येथील नगरपालिकेत बिनविरोध झालेल्या नगराध्यक्ष निवडीवर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने अचानक केलेल्या बदलामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार ज्योत्सना विसपुते यांचा अर्ज नामंजूर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते दिलीप खोडपे, उमेदवार ज्योत्सना विसपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील आरोप केले आहेत. जामनेर येथील बिनविरोध झालेल्या नगराध्यक्ष निवडीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

बिनविरोध निवड आता वादाच्या भोवऱ्यात

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज पात्र असतानाही तो नामंजूर झाल्यानेच नगराध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. या दाव्यामुळे आता जामनेर नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साधना महाजन यांची झालेली बिनविरोध निवड आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अचानक निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात बदल करून नामनिर्देशन अर्जात एका सूचकाऐवजी पाच सूचकांची नावे देणे बंधनकारक केले. आयोगाने ऐनवेळी केलेल्या या नियमातील बदलामुळे राज्यातील अनेक उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले, माझा देखील अर्ज नामंजूर केला आहे अशी माहिती ज्योत्सना विसपुते यांनी दिली.

उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

यासह 18 नोव्हेंबरचा आदेश त्वरित रद्द करून 17 नोव्हेंबरचा आदेश पूर्वावत करावा, अशी मागणी उमेदवार ज्योत्सना विसपुते यांनी केली असून छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.