AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासेमारीची हौस नडली, 15 युवक 17 तासांपासून पाण्यात अडकले, अद्याप बाहेर काढण्यात अपयश, आता…

Rain In Nashik: घटनास्थळी युवकांना काढण्यासाठी मालेगाव अग्निशमन दलाचे पथक पोहचले आहे. तसेच धुळ्यावरुन SDRF टीमलाही बोलवण्यात आले. परंतु नदीपात्रातील अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला अद्याप यश नाही. मालेगावचे आमदार मुक्ती इस्माईल यांनी प्रशासनाकडे हेलिकॉप्टर पाठवण्याची मागणी केली आहे.

मासेमारीची हौस नडली, 15 युवक 17 तासांपासून पाण्यात अडकले, अद्याप बाहेर काढण्यात अपयश, आता...
मालेगावमध्ये नदीपात्रात अडकलेले युवक
| Updated on: Aug 05, 2024 | 8:55 AM
Share

राज्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरु आहे. यामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. पुणे, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये नदी पात्रात मासेमारीसाठी गेलेले युवक अडकून पडले आहे. गेल्या 17 तासांपासून 15 युवक पाण्यात अडकले आहे. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु अजूनही त्यात यश आलेले नाही. धुळ्यावरुन SDRF टीमलाही बोलवण्यात आले आहे. मालेगावचे आमदार मुक्ती इस्माईल यांच्याकडून बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्याची मागणी केली आहे. नदी किनारी बचावकार्य पाहण्यासाठी गर्दी झाली आहे.

गिरणा नदीत युवक अडकले

चणकापूर आणि पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रविवारी या दोन्ही धरणांमधून २० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरु आहे. मालेगावच्या संवदगाव शिवारात गिरणा नदीत मासेमारीसाठी रविवारी 15 पेक्षा जास्त युवक गेले होते. नदीपात्रातील एका टेकडीवर उभे राहून हे लोक मासेमारी करत होते. त्यावेळी रविवारी सायंकाळी अचानक पाणी वाढू लागले. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे काही युवक परत आले. त्यातील 15 युवक त्या ठिकाणी मासेमारी करत थांबले. परंतु पाणी जास्त वाढल्यामुळे ते परत येऊ शकले नाही. ते अडकून पडले. त्या युवकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनातर्फे रविवारीपासून बचावकार्य सुरु करण्यात आले. त्याला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे रविवारची रात्र देखील त्या युवकांना नदी किनारी काढावी लागली. नदीची पूर पातळीपासून ही टेकडी जवळपास दहा फूट उंच आहे. यामुळे सध्यातरी या युवकांना धोका नाही.

बचावासाठी आलेले पथक

एसडीआरएफ अन् अग्नीशमन दलाची पथक

घटनास्थळी युवकांना काढण्यासाठी मालेगाव अग्निशमन दलाचे पथक पोहचले आहे. तसेच धुळ्यावरुन SDRF टीमलाही बोलवण्यात आले. परंतु नदीपात्रातील अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला अद्याप यश नाही. मालेगावचे आमदार मुक्ती इस्माईल यांनी प्रशासनाकडे हेलिकॉप्टर पाठवण्याची मागणी केली आहे.

अकडलेल्या युवकांना पाहण्यासाठी झालेली गर्दी

नदी पात्रात जाऊ नये, प्रशासनाचे आवाहन

नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांत 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. हा जलसाठा नदीपात्रात सोडला जात आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. प्रशासनाकडून नदी पात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर काही युवक नदीपात्रात गेल्याने अडकून पडले आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.