मुलं होत नसल्याने अघोरी प्रकार? राऊत कुटुंब अडचणीत, कोर्टात काय युक्तिवाद झाला?
girija raut news : सून गिरीजा राऊत यांच्यावर अघोरी कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपी फिरोज शेखला अटक करण्यात आलं. त्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सून गिरीजा राऊत यांच्या आरोपीने विनायक राऊतांचं कुटुंब अडचणीत सापडलं आहे. गिरीजा यांनी राऊत कुटुंबावर अजामीनपात्र गुन्हे दाखल केल्यानंतर प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं. गिरीजा राऊत यांनी सासरच्या मंडळीने अघोरी प्रकार केल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी आरोपी भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक केली आहे. त्यानंतर आज फिरोज शेखला कोर्टात हजर केलं. मुलं होत नसल्याने भोंदूबाबाकडे गेल्याचा आरोप गिरीजा राऊत यांच्या वकिलांनी केला. या प्रकरणी आरोपी भोंदूबाबा फिरोज शेखला दोन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
आरोपी फिरोज शेखला अटक केल्यानंतर आज रविवारी कोर्टात हजर केलं होतं. गिरीजा राऊत यांचे वकील सागर कदम यांनी म्हटलं की, ‘ 1,2,3 आरोपी हे अनुक्रमे गिरीजा राऊत यांचे पती गीतेश राऊत, माजी खासदार विनायक राऊत आणि सासू आहेत. मुलं होत नाही म्हणून तपासणी केली आणि त्यानंतर अघोरी प्रकार केले गेले. या प्रकरणात आरोपीला अटक केली. त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी लिंबू टाचण्या बाकी गोष्टी जप्त केल्या आहेत. त्या ठिकाणी स्वतः तक्रारदार उपस्थित होते. त्याला ओळखलं आणि अटक केली. आरोपीकडून आरोप मान्य केले जात आहेत’.
आरोपी भोंदूबाबा फिरोज शेखच्या वकिलांनी म्हटलं की, या प्रकरणाची १० जुलै रोजी नोंद झाली. तक्रारदाराने याबाबत तक्रार दिली. तक्रारदाराने शेख कधी आले, याबाबत कुठलीही तारीख दिली नाही. तसेच या पूर्वीही कुठल्यातरी बाबांकडे गेले, त्याचीही कुठलीही नोंद नाही. शेखच्या वडिलांची दर्गा होता. त्याची पाठपूजा करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांनी कोणाला बोलवलं नव्हतं, ते स्वेच्छेने आले होते. शेखकडून धागे दोरे लिंबू जप्त केलेत, तर ते कुठे आहेत. आम्हाला न्यायालयीन कोठडी द्यावी’.
गिरीजा राऊत यांचे वकील कदम हे शेखच्या वकिलाला प्रत्युत्तर देताना म्हटलं की, ‘तो दर्गा आहे. ते पूजापाठ करताहेत, हे स्वतः आरोपीचे वकील म्हणत आहेत. गुन्ह्याची कबुली स्वतः दिलेली आहे, तपासातही तसे आढळून आले आहे. महाराष्ट्र असे प्रकार वाढतहेत. आम्ही बोलवलं नाही, असे ते म्हणत असले तरी पूजापाठ तर केली आहे’.
