AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहेब, पाणी द्या… मुलांची लग्नं जमत नाहीत; बार्शीच्या तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे आर्त हाक

राज्यात दुष्काळसदृश स्थितीमुळे पिकं करपली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानोरे येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. बार्शीतील एका तरुणाने पाणीटंचाईमुळे मुलांची लग्नं जमत नसल्याची व्यथा मांडत, उजनी धरणातून पाणी देण्याची मागणी केली.

साहेब, पाणी द्या… मुलांची लग्नं जमत नाहीत; बार्शीच्या तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे आर्त हाक
| Updated on: Sep 23, 2026 | 5:21 PM
Share

राज्यात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी अनेक पिकं करपली आहेत. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसमोरही पाण्याचं मोठं संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यातील विविध भागांचा दौरा करत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांनीही अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे.  फडणवीस यांनी धानोरे येथे पाण्याअभावी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपल्या समस्या आणि व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.

बार्शीच्या पाणीप्रश्नावर तरुणाची आर्त हाक

दरम्यान, सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील पाणीप्रश्नाचा मुद्दा एका तरुणाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधत असताना समाधान शिंदे या तरुणाने त्यांच्याशी संवाद साधला. बार्शी तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असून, त्याचा परिणाम शेतीसोबतच सामाजिक जीवनावरही होत असल्याचं समाधान शिंदे यांनी सांगितलं. बार्शी तालुक्याला उजनी धरणातून पाणी देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

‘पाणी नसल्यामुळे मुलांची लग्नं जमत नाहीत’

“मुख्यमंत्री साहेब, बार्शीला पाणी नसल्यामुळे इथल्या मुलांची लग्नं जमत नाहीत,” अशी व्यथा समाधान शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. पाण्याअभावी शेतीचं मोठं नुकसान होत असून, त्याचा परिणाम तरुणांच्या लग्नांवरही होत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे बार्शी तालुक्यासाठी उजनी धरणातून शक्य तितकं पाणी वळवावं, अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

त्या तरूणाचं म्हणणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे ऐकलं आणि सर्व नागरिकांना आश्वस्त केलं. “ उजनीमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्राचं पाणी आणतोय. ते आलं की जसं तिकडच्या भागाला आपण पाणी दिलं, तसं इकडच्या भागालाही आपण पाणी देऊ. काळजी करू नका,” असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं.

Follow Us
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट