खूशखबर..! गोकुळकडून दूध उत्पादकांना गुढी पाडव्याची भेट; दूध खरेदी दरात वाढ

खूशखबर..! गोकुळकडून दूध उत्पादकांना गुढी पाडव्याची भेट; दूध खरेदी दरात वाढ
गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ
Image Credit source: TV9

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावरच दूध उत्पादकांसाठी ही दरवाढ गोकुळने जाहीर केली आहे. दूध उत्पादकांना दिलासा देणारी ही दरवाढ असल्याचेही गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 30, 2022 | 10:20 PM

कोल्हापूरः पश्चिम महाराष्ट्रातील सहकार तत्वावर आधारित आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनसामान्य शेतकऱ्याची ज्या दूध संघावर आर्थिक गणित चालू असते, त्या गोकुळ दूध संघाने (Gokul Dudh Sangh) दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. म्हैस, गायीच्या खरेदी दरात वाढ करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाडव्याची भेट दिली आहे. ही दरवाढ गोकुळ दूध संघाकडून 1 एप्रिल पासून दरवाढ लागू करणार असल्याचे कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळकडून निर्णय घेण्यात आला आहे. म्हैस व गाय दूध (Buffalo and cow milk) खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ केली असल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावरच दूध उत्पादकांसाठी ही दरवाढ गोकुळने जाहीर केली आहे. दूध उत्पादकांना दिलासा देणारी ही दरवाढ असल्याचेही गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले. पाडव्याच्या मुहूर्तावर ही दूध दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अशी झाली आहे वाढ

गोकुळ दूध संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ करिता दूध खरेदी दर 41.50 रुपयांवरुन 43.50 रुपये करण्यात येणार आहे. तर गाय दूध दरात 3.5 फॅट 8.5 एसएनएफ करिता प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गायीच्या दुधाचा दर 27.00 रुपयांवरुन 29.00 रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

गोकुळची लक्षवेधी निवडणूक

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ हा सहकार तत्वावर उभा राहिला असला तरी त्या गोकुळ दूध संघावरच जिल्ह्यातील राजकारणाची गणित अवलंबून असतात. त्यासाठीच गोकुळच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेतेही शड्डू ठोकून उभा राहतात. यावर्षीही झालेली गोकुळची निवडणूक चुरशीने पार पडली होती. ही निवडणूक होऊन काही दिवस होताच दूध खरेदी दरात वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ही गुढी पाडव्याची भेट मिळाली आहे.

शेतकऱ्यांना हातभार

कोरोना काळातील लॉकडाऊननंतर दूध दरात वाढ झाली असली तरी जनावरांसाठी लागणाऱ्या खाद्यांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघाने केलेली दरवाढ दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. महागाईच्या काळात ही दरवाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हातभारही लागणार आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Government DA : ठाकरे सरकारचं केंद्राच्या पावलावर पाऊल, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला

150 महिलांना प्रत्येकी 5 हजारांची मदत, लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्डचा उपक्रम काय?

Nana Patole : नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना करून दिली किमान समान कार्यक्रमाची आठवण, पत्रात नेमकं काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें