AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचं टेन्शन मिटलं, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंड रोखण्यात महायुतीला यश, गोकुळ गितेंचा दराडेंना पाठिंबा?

नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक विधान परिषद निवडणुकीमधील बंडखोरी रोखण्यात अखेर महायुतीला यश आलं आहे. गोकुळ गीते हे नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिवसेनेचं टेन्शन मिटलं, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंड रोखण्यात महायुतीला यश, गोकुळ गितेंचा दराडेंना पाठिंबा?
Gokul GeeteImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 8:11 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. नाशिक विधान परिषदेची निवडणूक चांगलीच चर्चेत असून, या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपकडून गणेश गिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोबतच त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. दरम्यान त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

परंतु जरी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी दुसरीकडे मात्र गोकुळ गीते यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत, आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. गोकुळ गीते यांच्या बंडखोरीचा मोठा फटका हा नरेंद्र दराडे यांना बसण्याची शक्यता होती. गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, यासाठी सातत्याने भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. अखेर समोर आलेल्या माहितीनुसार गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या प्रयत्नाला आता यश आलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ गिते हे आता नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार आहेत. गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.  नाशिकच्या जागेवर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान आता नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात यश आल्यानं शिवसेना शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाल्याचं दिसून येत आहे. गीते यांनी पाठिंबा दिल्यानं दराडे यांचा विधान परिषद निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. शिवसेनेसोबतच दराडे यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा