Gokul Milk Union President Election Results LIVE : मोठी बातमी, गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडे जाऊ शकतं
Gokul Milk Union President Election Results 2026 LIVE Updates in Marathi : गोकुळचा नवीन अध्यक्ष कोण होणार? त्याचा फैसला आज होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज गोकुळची निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शशिकांत पाटील-चुयेकर तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह पाटील रिंगणात आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
Gokul President Election Results LIVE : शिंदे शिवसेनेचे अजित नरके कोण? गोकुळच्या अध्य़क्षपदासाठी नाव चर्चेत
महायुतीत शिवसेनेकडे गोकुळचं अध्यक्षपद जाणार असेल तर करवीरचे शिंदे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांच्या नावाची चर्चा आहे. मागच्या अनेक वर्षांपासून गोकुळचे संचालक म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे.
-
Gokul President Election Results LIVE : गोकुळच्या अध्य़क्षपदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा ते राष्ट्रवादीचे राजेश पाटील कोण?
गोकुळच्या अध्यक्षपदी कोणाला नेमायचं? याची काल रात्रीपासून महायुतीत चर्चा सुरु आहे. आज सकाळी महायुतीची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीकडे गोकुळचं अध्यक्षपद जाणार असेल तर राजेश पाटील यांची निवड होऊ शकते. ते चंदगडचे माजी आमदार आहेत.
-
-
Gokul President Election Results LIVE : सतेज पाटील यांची पत्रकार परिषद होणार
गोकुळच्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर सतेज पाटील यांची पत्रकार परिषद होणार. अध्यक्ष निवडीनंतर सतेज पाटील सविस्तर भूमिका मांडणार. सकाळी 11 वाजता आहे निवडणूक.
-
Gokul President Election Results LIVE : मोठी बातमी, गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडे जाऊ शकतं
गोकुळच अध्यक्षपद शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडे जाऊ शकतं. राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद गेल्यास राजेश पाटील यांना आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे अध्यक्षपद गेल्यास अजित नरके यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. थोड्याचवेळात महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे.
-
Gokul President Election Results LIVE : आपण निवडणूक जिंकली म्हणजे जगाचा राजा झाल्यासारखे वागू लागले – हसन मुश्रीफ
50 टक्के अधिक 1 म्हणजे 14 सदस्य असल्याशिवाय कोरम पूर्ण करता येत नव्हता. जर त्यांना हे मान्य नव्हते तर त्यांनी कोर्टात जाऊन कोरम 13 चा करायला हवा होता. आपण निवडणूक जिंकली म्हणजे जगाचा राजा झाल्यासारखे वागू लागले. विजयाचा उन्माद अनेक दिवस चालू होता. त्यामुळे आम्ही सर्व व्यथित झालो होतो. गोकूळचे काम चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू. उद्या सकाळी आमची बैठक होऊन आम्ही अध्यक्ष निवडणार आहोत असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
-
-
Gokul President Election Results LIVE : गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती-महाविकास आघाडीचे उमेदवार कोण?
आज सकाळी 11 वाजता गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे .निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शशिकांत पाटील-चुयेकर तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांचेय पुत्र रणजीतसिंह पाटील यांच्यात थेट लढत होत आहे.
कोल्हापुरातील सर्वात मोठा दूध उत्पादक संघ असलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे. मागच्या महिन्यात गोकुळच्या संचालकपदाची निवडणूक झाली. पण अजूनही गोकुळचा अध्यक्ष ठरलेला नाही. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना आहे. गोकुळची निवडणूक ही जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. मतदारांना शपथा सुद्धा देण्यात आल्या. आज अखेर या सगळ्याचा फैसला होऊ शकतो.काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या तर महायुतीने 12 जागांवर विजय मिळवला. गोकुळमध्ये संचालकांची एकूण संख्या 25 आहे. अध्यक्षाची निवड करण्यासाठी 14 सदस्यांचा कोरम पूर्ण होण्याची आवश्यकता होता. हा आकडा समविचारी आघाडीकडे पण नाहीय आणि महायुतीकडे. कोरम पूर्ण करण्यासाठी समविचारी आघाडीला एक सदस्याची गरज आहे. आता राज्य सरकारने या निवडणुकीत लक्ष घातलं आहे. शासन नियुक्त चार सदस्यांची निवड करण्यात आली आहे. हा विषय कोर्टात पोहोचला आहे.