Gondia | गोंदिया जिल्ह्यात पुरामुळे 12 हजार हेक्टर शेतीचे नुकसान, शेतात पाणी साचल्यामुळे पंचनामे थांबले

| Updated on: Aug 18, 2022 | 1:24 PM

गोंदिया जिल्हात जुलै आणि आँगस्ट महिना हा नैसर्गिक आपत्तिचा महिना ठरला असून जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसाच्या थैमानाने तब्बल जिल्ह्यातील 12 हजार हेक्टरवरील पीके नेस्तनाबाभूत झाली आहेत.

Gondia | गोंदिया जिल्ह्यात पुरामुळे 12 हजार हेक्टर शेतीचे नुकसान, शेतात पाणी साचल्यामुळे पंचनामे थांबले
Follow us on

गोदिंया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका जिल्ह्यातील 666 गावातील 22 हजार 185 शेतकऱ्यांना बासला आहे. तब्बल 12 हजार हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चार दिवसाअगोदर आलेल्या मुसळधार पावसाने (Rain) जनजीवन विस्कळीत करून टाकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून टाकला आहे. तर मायबाप सरकार कोणती मदत करतोय याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. यामुळे शेतींचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र बघायला मिळतंय.

पावसाच्या थैमानाने तब्बल जिल्ह्यातील 12 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

गोंदिया जिल्हात जुलै आणि आँगस्ट महिना हा नैसर्गिक आपत्तिचा महिना ठरला असून जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसाच्या थैमानाने तब्बल जिल्ह्यातील 12 हजार हेक्टरवरील पीके नेस्तनाबाभूत झाली आहेत. दुबार, तिबार पेरणीचीही वेळ निघून गेल्याने 22 हजार 185 शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे आहेत.

हे सुद्धा वाचा

शेतात पुराचे पाणी साचल्याने पंचनामे करण्यास अडथळा

शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती कसली होती. मात्र पुराने ती वर्षभराची पुंजी हिरावून नेली. मात्र राज्याचे सरकार सत्ताकारणात व्यस्त आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे असा सवाल निर्माण झाला आहे. तर शेतामध्ये आताही पुराचे पाणी साचून असल्यामुळे पंचनामे करण्यास उशिर होत असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगत आहेत. मात्र आता शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांना सरकारकडून नेमकी काय मदत होते हे बघण्यासारखे ठरणार आहे.