Gondia : लाखमोलाची बॅग आणि 12 वर्षांच्या मुलाचं लाखमोलाचं काम! सोन्यानं भरलेली बॅग मिळाल्यावर काय केलं? वाचा..

| Updated on: May 01, 2022 | 7:21 AM

Gondia News : एका लहान मुलाच्या प्रामाणिकपणामुळे सोन्याची बॅग पुन्हा मिळाली.

Gondia : लाखमोलाची बॅग आणि 12 वर्षांच्या मुलाचं लाखमोलाचं काम! सोन्यानं भरलेली बॅग मिळाल्यावर काय केलं? वाचा..
प्रामाणिकपणाचं कौतुक
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

गोंदिया : 12 वर्षीय मुलाने परत केले महिलेचे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (Gold jewellery) परत केले आहेत. ही बॅग मिळाल्यावर संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मुलानं जे केलं, ते खरंच कौतुकास्पद आहे. गोंदिया शहर पोलिसांनी (Gondia City Police) या मुलाचा म्हणूनच सत्कारही केलाय. गोंदिया (Gondia News) येथील गिता राजू तिडके, वय २९ वर्ष, व कोमल मधुकर तिडके, वय २० वर्षे, दोघी रा. श्रीनगर, गोंदिया या राहत्या घरातून सोनं घेऊन निघाल्या होत्या. घरातून त्यांच्या प्लेझर मोटर सायकलवरुन मुथुट फायनान्स कंपनी, बंजरग दल कार्यालयाजवळ, गोंदिया येथे सोने गहाण ठेवण्यासाठी त्या निघाल्या. मात्र सोनं गहाण ठेवायला जात असतानाचा 2 तोळे वजनाचं सोन्याची २ मंगळसूत्र, तीन जोड सोन्याचे रिंग आणि एक सोन्याचे पदक बॅगमध्ये ठेवलेलं होतं. एकूण 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे दागिने तसेच आधार कार्ड आणि पॅनकार्ड असलेली प्लास्टीक कॅरीबॅग रस्त्यामध्ये कुठेतरी पडली. सदर बाब महिलेच्या लक्षात येताच तिने तात्काळ पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे येवून याबाबत पोलिसांना कळवलं.

पोलीसही सतर्क

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून लागलीच, या महिलेची बॅग शोधण्यासाठी सुरुवातही केली. गोंदिया शहर इथल्या पोलीस स्टेशनमधली पथकाने कॅरीबॅगचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरु केली. पण एका लहान मुलाच्या प्रामाणिकपणामुळे ही बॅग पुन्हा तिडके यांना मिळाली.

बारा वर्षांच्या मुलाचा प्रामाणिकपणा…

सोनं गहाण ठेवण्यासाठी जासत असताना रस्त्यात ही सोन्याची बॅग पडली. ती एका बारा वर्षांच्या मुलाला सापडली. त्यानंतर प्रामाणिकपणे ही बॅग आपल्या आईकडे आणून दिली. त्यानंतर या कुटुंबीयांनी मिळून बॅगेतील आधार कार्डच्या मदतीने ही बॅग नेमकी कुणाची आहे, याचा शोध घेतला आणि बॅग संबंधितांपर्यंत पोहोचवली.

प्रामाणिकपणाचं कौतुक

सोन्याचे दागिने असलेली कॅरीबॅग ही पोद्दार इन्टरनॅशनल स्कूलमध्ये वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले महेन्द्र उर्फ रिंकु भोलाराम आगळे, वय 40 वर्षे, रा. देशबंधु वार्ड, गोंदिया यांचा मुलगा नामे निकुंज महेंद्र आगळे, वय 12 वर्षे याला घरा समोरीच्या रस्त्यावर आढळली. त्याने ती उचलून त्याची आई कविता महेंद्र आगळे यांना दिली. महेन्द्र उर्फ रिंकु भोलाराम आगळे हे नोकरीवरुन घरी परत आल्यानंतर निकुंजने त्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली.

त्यावेळी त्यांनी तात्काळ मिळालेल्या आधार कार्डच्या आधारे सदर महिलेची माहिती काढली. त्यानंतर त्यांच्या घरी जावून मिळालेले सर्व दागिने आणि इतर सामान त्यांना प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक केलं जातंय. गोंदिया शहर पोलिसांनी महेन्द्रचा सत्कार करून कौतुकही केलंय.