बळीराजासाठी गुड न्यूज! शेतकरी कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना होणार फायदा? आकडा आला समोर

Farmer Loan Waiver Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाल्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मान्यता मिळाली आहे. या कर्जमाफीचा फायदा किती शेतकऱ्यांना होणार याची आकडेवारी आता समोर आली आहे.

बळीराजासाठी गुड न्यूज! शेतकरी कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना होणार फायदा? आकडा आला समोर
Farmer Loan Wavier Latest Update
Image Credit source: Google
| Updated on: Jun 02, 2026 | 3:21 PM

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने याबाबतचा शासन निर्णय सध्या जारी होणार नाही, मात्र आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतचा अध्यादेश सरकारकडून काढला जाणार आहे. आज आपण या शेतकरी कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना फायदा होणार हे जाणून घेऊयात.

किती शेतकऱ्यांना फायदा होणार?

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजूरी देण्यात आली आहे, मात्र आचारसंहितेमुळे याची अधिकृत घोषणा झालेली नाही. कॅबिनेटच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 65 लाखांपेक्षा जास्त कर्जखात्यांची कर्जमाफी होणार आहे. एकूण 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे. राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कर्जमाफी योजनेला मंजूरी, मात्र घोषणा नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना महत्त्वाची माहिती दिली होती. शेतकरी कर्जमाफीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. कर्जमाफीच्या निर्णयानुसारच पुढील कार्यवाही होईल. पण कुठलीही घोषणा होणार नाही. निवडणूक आयोगाने आम्हाला कर्जमाफीची घोषणा न करण्यास सांगितले आहे असं फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे कर्जमाफीला मंजूरी मिळाली असली तरी याबाबत घोषणा होणार नाही.

शेतकऱ्यांना काय फायदा होणार?

शेतकरी कर्जमाफीची योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या नावाने ओळखली जाणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50,000 रूपयांपर्तंचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही मान्सूनच्या तोंडावर मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे, आता आगामी काळात लवकच कर्जमाफीची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.

56 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा

Follow Us