AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST Bus Reservation : लालपरीच्या नव्या ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

एसटीच्या प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट बुक करता यावे ऑनलाईन तिकीट प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या ऑनलाईन सेवेद्वारे मोबाईलवर देखील तिकीट बुक करता येत आहे. एसटी महामंडळाने या सेवेतील अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन देखील जारी केले आहेत.

ST Bus Reservation : लालपरीच्या नव्या ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
msrtc new online tickets reservation systemImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 22, 2024 | 4:00 PM
Share

मुंबई : एसटीच्या तिकीट आरक्षणासाठी असलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आधुनिकीकरण झाले आहे. 1 जानेवारी 2024 पासून एसटीच्या तिकीटाचे आरक्षण प्रणालीची आधुनिकीकरण केले आहे. त्यामुळे एसटीच्या तिकीटांचे आरक्षण आता झटपट होत आहे. पूर्वीप्रमाणे एसटीचे तिकीट ऑनलाईन बुक करताना अडचणी येत नाहीत. एसटीच्या ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणालीद्वारे 1 जानेवारी 2024 ते 20 मे 2024 या दरम्यान 12 लाख 92 हजार तिकीटांची विक्री झाली आहे. याच काळात गेल्यावर्षी 9 लाख 75 हजार तिकीटांची विक्री झाली होती. याचा अर्थ गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तीन लाख अधिक तिकीटे विकली गेली आहेत. सध्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे 10 हजार तिकीटे काढली जात आहेत.

एसटीच्या प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट बुक करता यावे यासाठी एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच आपल्या स्मार्टफोन मोबाईलवर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट बुक करता येत आहे. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये 1 जानेवारी, 2024 पासून बदल करुन ती आधुनिक करण्यात आली. परिणामी त्यातील अनेक त्रूटी दूर झाल्याने ही ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी आणि सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीव्दारे प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे ‍ देखील आगाऊ आरक्षण मिळत आहे.

 प्रवाशांच्या सोयीसाठी हेल्पलाईन नंबर

एसटी प्रवाशांनी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation मोबाईल ॲपचा वापर करावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास 7738087103 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. हा नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी 24 तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन देखील तिकीटे बुक न होणे ( पेमेंट गेट वे संदर्भात ) या तक्रारींसाठी 0120-4456456 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले