गाढ झोपेत होते, अचानक स्फोट झाला अन् घर पेटलं, एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू, मुंबई हादरली
मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एका इमारतीत पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी अग्निकांडात 3 जणांचा गुदमरून मृत्यू झाला, ज्यात 2 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. अग्निशमन दलाने आग विझवली असली तरी, आगीचे नेमके कारण अजून अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

गाढ झोपेत असलेल्या मुंबईकरासांठी शनिवारीची पहाट भयानक ठरली. गोरेगाव पश्चिमेकडील एका इमारतीत झालेल्या भीषण अग्निकांडामुळे प्रचंड खळबळ माजली. या आगीत 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनीही तातडीने धाव घेत अथ्क प्रयत्न करून ती आग आटोक्यात आणली. मात्र, घरात झोपलेल्या तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृत नागरिकांमध्ये 2 पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामुळे भीतीचे वातावरण असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
बीएमसीच्या अधिकृत निवेदनाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग नगर येथील इमारतीमधील तळ मजल्यावरील घरात आग लागली. फ्रीजचा मोठा ब्लास्ट होऊन ही आग लागली. प्रथम ती आग प्रामुख्याने तळमजल्यावरील विद्युत वायरिंग आणि घरगुती वस्तूंपर्यंत मर्यादित होती, मात्र ती पसरली आणि पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील तीन लोकांच्या कपड्यांना आग लागली. त्या घराचा नंबर अजून समोर आलेला नाही. पहाटेच्या सुमारास ही आग लागली तेव्हा सगळेच गाढ झोपेत होते. मात्र आगीच्या ज्वाळा दिसताच, आग लागल्याचे समजतातच इमारतीतील नागरिकांनी फायर ब्रिगेडला फोन केला. तसेच ते जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिकांनी बादल्यांमधून पाणी ओतत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वीजचे कनेक्शन बंद करून फायर पब्रिगेडच्या जवानांनीही आगीवर नियंत्रण मिळवत ती पूर्णपणे विझवली.
जखमींना रुग्णालयात केलं दाखल पण
या आगीच्या ज्वाळांमुळे जखमी झालेल्या तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं आणि उपचारांसाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर आगीमुळे होरपळलेल्या तिघांचाही रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. हर्षदा पावसकर (वय 19), कुशल पावसकर (वय 12 ) आणि संजोग पावसकर (वय 48) अशी मृतांची नावं आहेत. पटली आहे. मुंबई अग्निशमन दलाच्ा जवानांनी ही आग पूर्णपणे विझवली आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली ते कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
