
बीड जिल्ह्यातील कुख्यात आरोपी गोट्या गित्ते उर्फ ज्ञानोबा मारुती गित्ते हा एका खून प्रकरणात फरार आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई झालेली आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अशातच त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देताना दिसत आहे. त्याने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेकदा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करत असतात . यावरुन गोट्या गित्तेने आव्हाड यांनी इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड तुमचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग येत आहेत. त्यात तुम्ही सॉरी सॉरी म्हणाताना दिसत आहेत. तुम्हा वंजारी समाजाचे नाही आहात. तुम्हाला वाल्मिक कराड यांची बदनामी करणे महागात पडणार आहे अशी धमकी गित्ते याने दिली आहे.
पुढे बोलताना गित्तेने म्हटलं की, ‘मी लहान माणूस आहे. मला फाशी होईल अथवा नाही, पण माझ्या दैवताला टार्गेट करु नका. तुम्ही धनंजय मुंडेना टार्गेट केलं आहे. परळीत येऊन गरीब श्रीमंत कोणालाही विचारा की अण्णा कोण आहेत ते. सगळेजण त्यांनी दैवत म्हणतील. मी आत्महत्या केली तर त्याचे जबाबदार तुम्ही असाल. जय हिंद जय महाराष्ट्र’
या धमकीवर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, गोट्या गित्ते हा अट्टल गुन्हागार आहे, त्याचे बंदूक फिरवतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याने याआधीही माझ्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरली होती. असे दोन तीन जण आहेत. अशा धमक्यांना घाबरणारा मी नाही. यांना एवढा माज येतो कुठून? हे कोण मला प्रमाणपत्र देणार वंजारी असण्याचं. यांना विचारून मी वंजारी झालोय का?
मी खानदाणी वंजारी आहे. वंजाऱ्यांना बदनाम करणारा वंजारी आहे. कष्ट करणाऱ्या घरात जन्माला आलेला वंजारी आहे. मी खून करून, बंदूक दाखवून जमिनी खाणारा वंजारी नाही. माझ्या जातीबद्दल मला प्रचंड अभिमान आहे. मी अशा धमक्यांना घाबरत नाही. यांना सत्तेचा माज आहे. असे अजून 3 व्हिडिओ मी देऊ शकतो असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.