AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..

मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, त्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मिश्कील टिप्पणी केल्याचं पहायला मिळालं आहे.

भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या..., राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..
raj thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 29, 2026 | 9:25 PM
Share

पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात पञकार वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली. यावेळी बोलताना राज्यातील विविध समस्यांचा त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये चांगलाचं समाचार घेतला. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा आली पाहिजे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. हिंदी भाषीक रिक्षा चालकांना आता मराठी शिकवली जाणार आहे, यावर बोलताना देखील राज ठाकरे यांनी यावेळी मिश्कील टिप्पनी केल्याचं पहायला मिळालं.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?  

मला ही आशा आहे. मी निराश नाही, मी ही पत्रकारीतेमधून आलो आहे.  पञकारिता बदललीय यात काही प्रश्न नाही. पञकारिताच्या जाणिवा मेल्या नाही तर सरकार तुम्हाला किंमत देत नाहीये. चांगले चांगले पञकार मंत्र्यांकडे काम करत आहेत. राजकारण्यांना तुमची भीती वाटली पाहिजे. परंतु  आता  कसेल त्याची जमीन नाही तर ज्याला दिसेल त्याची जमीन असं झालं आहे. मुंबईमध्ये हजारो अनाधिकृत बांधकामे कशी झाली? अदानींचा विषय मी मांडला त्याचं पुढे काय झालं? पत्रकारांनी हा विषय पुढे लावून का धरला नाही? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला. विरोधात बातमी टाकली की संपादकावर दबाव येतो दबाव आला की त्यांच्या बातम्याच बंद करा. नोकरी टिकवायची म्हणून पत्रकारिता सुरू आहे, असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी आली पाहिजे अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं होतं. आता या रिक्षा चालकांना मराठी शिकवली जाणार आहे, यावर बोलताना राज ठाकरे यांनी मिश्कील टिप्पणी केल्याचं पहायला मिळालं.  सध्या भैय्यांना मराठी भाषा शिकवायचं काम सुरू आहे. त्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या पत्रकारितेमध्ये देखील येतील, अशी मिश्कील टिप्पणी यावेळी राज ठाकरे यांनी केली आहे. ही गोष्ट त्यांनी गुजरातमध्ये करून दाखवावी,  जिथं जमीन भुसभुशीत असते तिथंच घुशी होतात, असा हल्लाबोलही यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?