Gram Panchayat Election Results 2021: उदय सामंत यांनी गड राखला, रत्नागिरीत 11 जागांवर शिवसेनेला मोठं यश

| Updated on: Jan 18, 2021 | 1:10 PM

हाती आलेल्या आकडेवारीनुसार, 11 च्या 11 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे रत्नागिरीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Gram Panchayat Election Results 2021: उदय सामंत यांनी गड राखला, रत्नागिरीत 11 जागांवर शिवसेनेला मोठं यश
उदय सामंत
Follow us on

रत्नागिरी : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी सुरू आहे. अशात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाली ग्रामपंचायत राखली आहे. पाली ग्रामपंचायतीत उदय सामंत यांनी बाजी मारली आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, 11 च्या 11 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे रत्नागिरीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. (Gram Panchayat Election Results 2021 Uday Samant won ShivSena wins 11 seats in Ratnagiri)

खरंतर, याआधीच पाली ग्रामपंचायतीमधील दहा जागांवर बिनविरोध निवड झाली होती. फक्त एका जागेवर निवडणूक होत होती. एका जागेवर सुद्धा सेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. रत्नागिरी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेनी बाजी मारली आहे. कर्ला, कळझोंडी, खेडशी, गडनरळ, पाली ग्रामपंचायती सेनेकडे गेल्यात. तर ओरी आणि काळबादेवी, कासारी ग्रामपंचायत गाव पॅनलकडे गेली आहे.

ओरी ग्रामपंचायतीत गाव पॅनलला 7 जागा मिळाल्या आहेत. तर कोतवडे ग्रामपंचायतीत सेना आणि भाजपच्या समसमाना जागा निवडूण आल्यात. सेनेला आणि भाजपला प्रत्येकी 5 तर समविचारी पक्षाला १ जागा मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 119 ग्रामपंतायती बिनविरोध झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे तब्बल 47 लाखांचा खर्च वाचला आहे. एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर निवडणुक आयोगाचा 40 हजारांचा खर्च वाचतो. रत्नागिरी जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंतायती बिनविरोध झाल्याने निवडणुक आयोगाचे पैसे वाचले आहेत.

निवडणुक म्हणजे पैशांचा खेळ असं आपण सहज म्हणतो. ग्रामपंचायत निवडणूक असो किंवा मग लोकसभेची निवडणुक, या निवडणुकीमुळे खर्च होणारा पैसा हा सर्वसामान्य जनतेच्या खिशातून कर रुपाने जात असतो. सध्या ग्रामपंतायत निवडणुकीची रंगत राज्यात पहायला मिळतेय. रत्नागिरीत सुद्धा अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील चित्र सष्ट झालं आहे. यात 479 पैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या बिनविरोध झालेल्या ग्रामपंतायतींमुळे निवडणूक आयोगाचे लाखो रुपये वाचले आहेत. (Gram Panchayat Election Results 2021 Uday Samant won ShivSena wins 11 seats in Ratnagiri)

संबंधित बातम्या –  

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : खडसेंच्या कोथळी गावात गृहयुद्ध, भाजप-राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे

(Gram Panchayat Election Results 2021 Uday Samant won ShivSena wins 11 seats in Ratnagiri)