AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यातील भूजल पातळी उंचावली, औरंगाबादमध्ये सर्वाधिक 5.13 मीटरनं वाढ

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी वाढलीय, औरंगाबादमध्ये सर्वाधिक तर लातूरमध्ये सर्वात कमी वाढ झाली. (Ground Water Level increased in Marathwada)

मराठवाड्यातील भूजल पातळी उंचावली, औरंगाबादमध्ये सर्वाधिक 5.13 मीटरनं वाढ
| Updated on: Nov 13, 2020 | 12:04 PM
Share

औरंगाबाद: ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील विविध जिल्ह्यांना मुसळाधार पावसाने झोडपले. मुसळाधार पाऊस आणि पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. लाखो हेक्टरवरील शेतीला याचा फटका बसला. मात्र, मुसळधार पावसाचा चांगला परिणाम समोर आला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये सर्वाधिक 5.13 मीटर तर लातूरमध्ये सर्वात कमी 0.92 मीटर भूजल पातळी वाढली आहे. (Ground Water Level increased in Marathwada districts)

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातील भूजल पातळी वाढली आहे.औरंगाबादमध्ये मागील 5 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक भूजल पातळी वाढली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद हा प्रमुख जिल्हा असून येथे 5.13 मीटर भूजल पातळी वाढलीय.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या एका अहवालानुसार मराठवाड्यात 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत साधारणपणे 722.5 मिलीमीटर पाऊस होतो. मात्र, यावेळी 844.7 मिमी पाऊस झाला आहे. यंदा मराठवाड्यात पाऊस सरासरीच्या 16.9 टक्के अधिक झाला. मराठवाड्यातील आठ पैकी सहा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. (Ground Water Level increased in Marathwada districts)

औरंगाबादमध्ये साधारणपणे 623.5 मिमी पाऊस होतो मात्र यंदा 951.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत औरंगाबादमध्ये 52 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत 5.13 मीटरनं वाढ झाली आहे. उस्मानाबादमध्ये 2.88 मीटर, बीडमध्ये 2.16 मीटर, जालनामध्ये 2.06 मीटर, परभणीमध्ये 1.89 मीटर, हिंगोलीत 1.40, नांदेडमध्ये 1.79 आणि लातूर मध्ये 0.92 मीटर भूजल पातळी वाढली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगामादमध्ये सर्वाधिक 5.13 मीटर तर लातूरमध्ये सर्वात कमी 0.92 मीटर भूजल पातळी वाढली आहे.

मराठवाड्यातील धरणांतील पाणी पातळी समाधानकारक

मराठावाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणांतील पाणी पातळी समाधानकारक आहे. औरंगाबादमधील सर्वात मोठं धरण जायकवाडी धरणातील पाणी पातळी चांगली आहे. लातूर, परभणी, बीड जिल्ह्यातील धरणांमध्येही पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण भरल्याने  लातूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

संबंधित बातम्या :

Rain Update | नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष टळणार, जायकवाडी धरण 65 टक्के भरलं

LIVE | नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांचा उद्यापासून पाहणी दौरा

(Ground Water Level increased in Marathwada districts)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.