AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांनी पूर्वीच्या काळातच… मंत्री भरत गोगावले यांचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात निशाणा..

मंत्री गोगावले यांनी नुकताच मोठे विधान केले. शरद पवार यांच्या विधानावर उत्तर देताना भरत गोगावले दिसले. भरत गोगावले सध्या पंढरपूर दाैऱ्यावर आहेत. रायगडचे पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये पोहोचले.

शरद पवारांनी पूर्वीच्या काळातच... मंत्री भरत गोगावले यांचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात निशाणा..
Bharat Gogawale Sharad Pawar
| Updated on: Sep 04, 2026 | 12:33 PM
Share

रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले. भरत गोगावले यांनी म्हटले की,  शरद पवारांनी निर्णय घेतला असता तर समाजाला फायदा झाला असता. विखे पाटलांनंतर मंत्री भरत गोगावले यांनीही शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. रोजगार हमी योजनेच्या बिलाचे 3 हजार कोटी केंद्राकडे असल्याचे त्यांनी म्हटले.  शरद पवारांनी पूर्वीच्या काळात मराठा आरक्षण प्रश्न निर्णय घ्यायला हवे होते. जुन्या काळात अटी शर्ती फारशा नव्हत्या. त्यावेळी निर्णय घेतला असता. तर यांचा फायदा समाजाला झाला असता. असे विखे पाटील यांना वाटले असेल. तर पवारांनी करायला हवे होते. अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे.

मंत्री गोगावले आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत कायद्याच्या चौकटीत बसून तज्ज्ञ मंडळी हैद्राबाद, सातारा गॅझेट तपासात असल्याचेही गोगावले म्हणाले. रोजगार हमी योजनेतील अनेक ठेकेदारांची बिल राहिली आहेत. यामध्ये शिवराज सिंह चौहान यांच्याकडून महाराष्ट्राला 3 हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

ही रक्कम केंद्राकडे आहे. 3 हजार कोटीची रक्कम आल्यावर अनेक योजनेतील बिल दिली जाणार असल्याचे यावेळी गोगावले म्हणाले आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण प्रथमच पंढरपूरला आलो आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आपण पालकमंत्री व्हावे. म्हणून विठ्ठलाला नवस केले होते. त्यासाठीच आज आपण दर्शनासाठी आलो आहे. आपल्या पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते काहीही बोलतात.

पण , पालकमंत्री पदाला एकनाथ शिंदे यांनी स्थगिती आणली. म्हणूनच पालकमंत्री पद मिळाले. त्यामुळे कुणी काहीही बोलो. त्यांचे तोंड बंद करू शकत नाही. त्यामुळे जो दिला उसका भला… न दिया उसकाभी भला…असे म्हणत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिला. भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद हवे होते. महायुतीत यावरून मतभेद होते. अखेर त्यानंतर भरत गोगावले यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली.

Follow Us
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर