AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, नांदेड, सोलापूरनंतर आता जीबीएस आजाराचं लोण संभाजीनगरपर्यंत, घाटी रुग्णालयात पेशंट येताच खळबळ

महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, सोलापूर आणि आता संभाजीनगरमध्ये गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) चा प्रादुर्भाव वाढत आहे. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात तीन रुग्ण आढळले आहेत. GBS हा संसर्गजन्य आजार नाही, परंतु योग्य काळजी आणि त्वरित वैद्यकीय मदत आवश्यक आहे. नागरिकांनी घाबरू नये, परंतु लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क आहे आणि उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

पुणे, नांदेड, सोलापूरनंतर आता जीबीएस आजाराचं लोण संभाजीनगरपर्यंत, घाटी रुग्णालयात पेशंट येताच खळबळ
| Updated on: Jan 29, 2025 | 3:11 PM
Share

सध्या राज्यभरात GBS आजाराचे थैमान सुरू असून पुणे, नांदेड, सोलापूरनंतर आता या आजाराचं लोण छत्रपती संभाजीनगरपर्यंतदेखील पोहोचलं आहे. छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे 3 रुग्ण आढळले असून त्यामध्ये 2 महिला आणि एका 10 वर्षीय मुलीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊन नये पण सतर्क रहावे असे आवाहन डॉक्टरांतर्फे करण्यात आलं आहे.

पुण्यानंतर आता छत्रपती संभाजी नगर मध्येही गुलियन बॅरे सिंड्रोमने एन्ट्री केलीय. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दोन महिला आणि एका दहा वर्षीय मुलीला आजाराची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मागील वर्षभरात घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिली. हा आजार कोरोना सारखा संसर्गजन्य नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु काळजी घेणे आवश्यक असल्यासही त्यांनी यावेळी सांगितले. या आजाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरची आरोग्य यंत्रणा देखील आता अलर्ट झाली असून वेळ पडली तर वेगळा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी वार्ड असल्याची माहिती यावेळी अधिष्ठाता यांनी सांगितले. दरम्यान या आजाराची लक्षणे आढळतात त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलय.

पुण्यातील नांदेडगाव परिसरात जीबीएस आजाराचे रुग्ण

पुण्यात सध्या GBS आजाराने दहशत निर्माण केली आहे. जीबीएसच्या फैलावासाठी दूषित पाण्याचा स्त्रोताला कारणीभूत मानलं जात आहे. पुण्यातील नांदेडगाव परिसरातही जीबीएस आजाराचे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या सात तज्ज्ञांच पथक पुण्यात दाखल झालं आणि पाहणीकरण्यात आली.

घाबरू नका, अंगावर आजार काढू नका, सोलापूर महानगरपालिकेचे आवाहन

दरम्यान सोलापुरातही जीबीएसचे रुग्ण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. अचानकपणे हाता – पायात , अंगात अशक्तपणा जाणवत असेल किंवा कोणतीही लक्षणे आढळल्यास अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच जास्त काळ आलेला ताप, खोकला, उलट्या, जुलाब असा त्रास झाल्यास त्वरित आरोग्य केंद्रात चाचण्या करून घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार न घेण्याचे आवाहन सोलापूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहा अशा सूचना महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

योग्य औषध उपचार केल्यास जीबीएस टाळता येऊ शकतो

यासंदर्भात डॉ. भूषण किन्होळकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जीबीएसला घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य काळजी घेतल्यास जीबीएस आजारापासून आपण दूर होऊ शकतो. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यास, तसेच बाहेरचे पाणी प्यायल्यास जीबीएसची लागण होण्याची शक्यता जास्त आहे, अशी माहिती डॉ. भूषण किन्होळकर यांनी दिली. या आजारात अशक्तपणा, थकवा जाणवणे शिवाय श्वास घेण्यास त्रास होणे अशी काही लक्षणं आहेत. मात्र योग्य औषध उपचार केल्यास जीबीएस टाळता येऊ शकतो असेही डॉक्टरांनी नमूद केलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.