“युतीच्या काळात हातात चिमण्या मारण्याची बंदूक, आघाडीने थेट बॉम्बच दिला”

शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी युतीच्या सरकारमध्ये आणि महाविकासआघाडीमध्ये मोठा फरक असल्याचं विधान केलं आहे (Difference between Fadnavis and Thackeray Government).

युतीच्या काळात हातात चिमण्या मारण्याची बंदूक, आघाडीने थेट बॉम्बच दिला
Follow us
| Updated on: Jan 01, 2020 | 11:10 PM

जळगाव : शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी युतीच्या सरकारमध्ये आणि महाविकासआघाडीमध्ये मोठा फरक असल्याचं विधान केलं आहे (Difference between Fadnavis and Thackeray Government). तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात माझ्या हातात चिमण्या मारण्याची बंदूक देण्यात आली होती. मात्र, आता महाविकासआघाडीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट बॉम्ब दिल्याचं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.

गुलाबराव पाटील यांनी महाविकासआघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये संधी मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. मंत्रिमंडळ विस्तारात जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणार असल्याचा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

एकनाथ खडसे आमच्या संपर्कात : गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्ण तयारी झाल्याचं सांगत योग्य वेळी संख्याबळ सिद्ध करु, असं म्हटलं आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, “महाविकासआघाडीची बैठक झाली. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. या निवडणुकीत आघाडीचाच उमेदवार असेल. निवडणुकीत आम्ही आमचं संख्याबळ सिद्ध करुन दाखवू. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. किती नेते संपर्कात आहेत हे मात्र आज सांगू शकत नाही. जिल्हा परिषदेसाठी आमची तयारी झाली आहे.”

दरम्यान, जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार असणारे गुलाबराव पाटील त्यांच्या अस्सल गावरानी भाषेतील भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. युतीत निवडणूक लढत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या वेळी आक्रमक रुप धारण केल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना यावे लागल्याचंही याआधी पाहायला मिळालं आहे. मात्र, आता बदललेल्या सत्ता समीकरणांनुसार त्यांनी भाजपला थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.