उन्हात बसतो…मरतो…मरतो… गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाविरोधात मोठी मागणी!

गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे हे रिलस्टार आहेत, असे सदावर्ते म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाच्या लाभाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही त्यांनी केली.

उन्हात बसतो...मरतो...मरतो... गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाविरोधात मोठी मागणी!
gunratna sadavarte and manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 28, 2026 | 6:15 PM

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगे हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणार आहेत. तसा इशारा त्यांनी दिला आहे. येत्या 30 मे रोजीपासून ते आपल्या उपोषणाला आंतरवाली सराटी येथे सुरुवात करणार आहेत. मी उपोषण करणार आहे. परंतु कोणत्याही मराठा बांधवाने आंतरवाली सराटीमध्ये येऊ नये, कुठेही दुसरीकडे उपोषण करू नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, जरांगे यांनी एकीकडे उपोषणाचे हत्यार उपसले असल्याने आता अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. जरांगे हे रिलस्टार आहेत. ते लोकांना भावनिक आवाहन करत आहेत, असा हल्लाबोल सदावर्ते यांनी केला. तसेच मराठा आरक्षणाचा किती लाभ होतोय, यासाठी श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

अनाथंचे आरक्षण वाढवले पाहिजे

गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. अनाथांचे आरक्षण वाढवले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. अनाथांच्या बाबतीत सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. शंभर जागा असतील आणि अनाथांसाठी जागा नसतील तर त्यांना आणखी अनाथ करण्यासारखे आहे. अनाथांचं आरक्षण हे एक टक्क्यापेक्षा जास्त वाढलं पाहिजे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या लाडासाठी सध्या बेकायदेशीरदृष्ट्या दोन दोन आरक्षण चालू आहेत. त्यावर सरकारने येणाऱ्या अधिवेशनात श्वेतपत्रिका प्रकाशित करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाची श्वेतपत्रिका काढा

एसईबीसी म्हणून नोकऱ्यांत, शिक्षणात, एमबीबीएस, बीडीएस, इंजिनिअरिंगला किती लाभ झाला, कुणबी मराठा म्हणून किती प्रवेश झाले किती लाभ मिळाला हे समोर येणं गरजेचं आहे. सरकारने यावर श्वेतपत्रिका प्रकाशित करावी. ही जबाबदारी सरकारची आहे, असेही सदावर्ते म्हणाले.

हा रिलस्टार जुनाच आहे

पुढे बोलताना त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली. मनोज जरांगे हे पॉलिटिकल एन्फ्लुएन्सर, आंदोलन रिलस्टार आहेत. जरांगे…जरांगे…जरांगे…हा रिलस्टार जुनाच आहे, अशा शब्दांत सदावर्ते यांनी जरांगे यांची खिल्ली उडवली. सध्या त्यांची नवी रिल आलेली आहे. ज्या राजकारण्यांचा वाईट काळ सुरू असतो आणि त्यांना आपण थोडं चर्चेत यायला हवं असं वाटतं ते जरांगे यांची भेट घ्यायला जातात, असेही पुढे सदावर्ते म्हणाले.

उन्हात बसतो…मरतो…मरतो

जरांगे म्हणत आहेत की उन्हात बसतो…उन्हात बसतो…मरतो…मरतो…मरतो…बाजावर बसतो…बजावर बसतो…असं ते म्हणत आहेत. पण ते कशासाठी मरत आहेत, असेही पुढे जरांगे म्हणाले. या मारण्यामागे काहीतरी कारण आहे का? असा सवालही सदावर्ते यांनी केला. मनोज जरांगे हे स्वत:च्या प्रकृतीवर घाला घालून घेत असतील. मनोज जरांगे हे भानिक आवाहन करत आहेत.

Follow Us