पवारांसमोर 22 एस.टी. संघटनेचे नेते कसे होते? सदावर्ते म्हणाले, मला तर तो पवारांचा वाढदिवस वाटला…

पवारांसमोर 22 एस.टी. संघटनेचे नेते कसे होते? असा सवाल सदावर्तेंनी उपस्थित करत मला तर तो पवारांचा वाढदिवस वाटला, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

पवारांसमोर 22 एस.टी. संघटनेचे नेते कसे होते? सदावर्ते म्हणाले, मला तर तो पवारांचा वाढदिवस वाटला...
ॲड. गुणरत्न सदावर्ते

मुंंबई : आज एसटी संघटना आणि शरद पवार, अनिल परब यांच्यात जी बैठक झाली त्यावर हटवलेले वकील गुणरत्न सादवर्ते यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पवारांसमोर 22 एस.टी. संघटनेचे नेते कसे होते? असा सवाल सदावर्तेंनी उपस्थित करत मला तर तो पवारांचा वाढदिवस वाटला, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. एवढच नाही तर सदावर्तेंनी या संघटनांची कुंडली मांडली. तसेच शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमत्री आहेत का? परब मुख्यमंत्र्यांकडे न जाता पवारांकडे का गेले? असा खोचक सवाल सदावर्तेंनी विचारला.

पवारांचा वाढदिवस होता का?

आयपीएलच्या खेळाप्रमाणे शरद पवार याकडे बघत आहे, याला महाराष्ट्र प्रश्न विचारत राहणार, वाढदिवस, किंवा शोकसभा, किवा आमच्याकडे जेल ऑथॉरिटी असते, यावेळी आयोचे लोक तक्रारींबद्दल विचारतात, तसाच आज प्रकार वाटला, आधी पवारांच्या तोंडाकडे पाहून एसटी संघनाचे कर्मचारी बोलत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. अनिल परब यांनी मुख्यमंत्र्याकडे जायला हवं होतं परबांनी पवारांकडे जायला नको होतं, परबांनी पवार काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, यावर शिक्कामोर्तब केलंय का? असा सवालही त्यांनी विचारला,

जे गुजरले ते गुजरले

त्यांना हटवलं त्याबद्दल विचारले असता, जे गुजरले ते गुजरले अशी प्रतिक्रिया सदावर्ते यांनी यावेळी दिली, माझ्याकडे 75 हजार कष्टकऱ्यांचे वकीलपत्र आहे, मला या संघटनांच्या वकीलपत्रांची गरज नाही, असेही ते म्हणाले. तसेच प्रत्येक मृत्युला जबाबदार यापुढे पवार असतील असे वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. पवार न्यायालयातील प्रकरणावर कसे बोलले? पवारांनी पु्न्हा कायदा हातात घेतला, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

Pune crime| पुण्यात हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर कर्मचाऱ्याने केलं असं काही की …

Nashik Gas Leakage|गॅसच्या भडक्याने काचा फुटल्या, दरवाजा तुटला, 6 जण होरपळले!

सिंधुदुर्गात सेना-भाजप पुन्हा आमनेसामने, उदय सामंतांना भाजप कार्यकर्त्यांचा घेराव

Published On - 4:39 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI