सिंधुदुर्गात सेना-भाजप पुन्हा आमनेसामने, उदय सामंतांना भाजप कार्यकर्त्यांचा घेराव

जिल्हा समितीच्या ऑनलाईन बैठकीला भाजप कार्यकर्ते जोरदार विरोध करताना दिसून आले. जिल्हा नियोजन बैठक ऑनलाईन का घेता? असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना नियोजन सभागृहाच्या बाहेर घेराव घातला.

सिंधुदुर्गात सेना-भाजप पुन्हा आमनेसामने, उदय सामंतांना भाजप कार्यकर्त्यांचा घेराव
उदय सामंत

सिंधुदुर्ग : कोकणातलं शिवसेना विरुद्ध राणे हे राजकीय युद्ध आजपर्यंत गाजत आलं आहे. कोकणात अनेकदा यावरून कार्यकर्तेही आमनसामने आल्याचे दिसून येतात. आज पु्न्हा सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याचे चित्र काही काळ दिसून आले. त्याला कारण ठरलंय जिल्हा नियोजन समितीची होणारी बैठक, या बैठकीवरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी थेट मंत्री उदय सामंत यांनाच घेराव घातला. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन बैठकीला भाजपचा विरोध

जिल्हा समितीच्या ऑनलाईन बैठकीला भाजप कार्यकर्ते जोरदार विरोध करताना दिसून आले. जिल्हा नियोजन बैठक ऑनलाईन का घेता? असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना नियोजन सभागृहाच्या बाहेर घेराव घातला. यात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आणि उपाध्यक्ष राजन म्हापसेकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, केंद्र सरकारच्या गाईड लाईन्सप्रमाणे ऑनलाईन बैठक घेत असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. भाजपच्या पाच सदस्याना ऑफलाईन मिटींगला का घेतलं नाही? असा सवालही भाजप कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आला. याशिवाय 2022 आणि 23 चा आराखडा चर्चेशिवाय मंजूर कसा करणार? असे अनेक प्रश्न विचारत पालकमंत्री उदय सामंत यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा नियोजन समितीची आजची सभा म्हणजे फक्त सोपस्कर असा आरोप भाजपच्या राजेंद्र म्हापसेकर आणि अंकुश जाधव यांनी केला. काही दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेत पुन्हा जोरदार राडा झाल्याचेही आपण पाहिले आहे, त्यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले होते. आज पुन्हा तेच दिसून आले.

डोळ्यांच्या समस्याने त्रस्त आहात?, तर आजच ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा

Sharad Pawar : एस.टी. कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण, पगारवाढीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले, वाचा जशास तसं

ST Strike | राजकीय पक्षांमुळेच हे आंदोलन पेटलं का, चिघळलं का? पवार म्हणाले, मला राजकारण करायचं नाही

Published On - 4:09 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI