AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : एस.टी. कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण, पगारवाढीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले, वाचा जशास तसं

पहिल्यांदाच मी असं बघितलंय की दोन महिने संप सुरु आहे. कामगारांचं हित जपण्यासाठी जे लोक वेळ देतात, त्यांचचं ऐकणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. गेल्या 30 ते 40 वर्षात मी पाहिलंय. कामगारांचा दृष्टिकोन प्रवाशांच्या सेवेचाच असतो, मागण्या असतात पण त्या तेवढ्या पुरतं. मला इथे राजकारण करायचं नाही.

Sharad Pawar : एस.टी. कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण, पगारवाढीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले, वाचा जशास तसं
एस.टी. कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण, पगारवाढीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 3:55 PM
Share

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या 22 संघटनांसोबत बैठक झाली. सुमारे चार तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर एसटी कर्माचारी संघटना, शरद पवार आणि अनिल परब यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करीत त्यांच्या मागण्यांबाबतही स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाले शरद पवार?

पहिल्यांदाच मी असं बघितलंय की दोन महिने संप सुरु आहे. कामगारांचं हित जपण्यासाठी जे लोक वेळ देतात, त्यांचचं ऐकणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. गेल्या 30 ते 40 वर्षात मी पाहिलंय. कामगारांचा दृष्टिकोन प्रवाशांच्या सेवेचाच असतो, मागण्या असतात पण त्या तेवढ्या पुरतं. मला इथे राजकारण करायचं नाही. मला हा प्रश्न सोडवायचा आहे. कोणत्या राजकीय पक्षाने त्यांना घ्यायची आहे ती भूमिका घ्यावी. मी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. आज परिवहन मंत्री आणि सगळ्यांशी चर्चा झालीय. महाराष्ट्रातील प्रवासी वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. प्रवाशांच्या स्थितीचं वर्णन न केलेलं बरं. त्यात कोरोनाचा नवा अवतार समोर आलाय. आज महाराष्ट्राच्या अर्थकारणावर मोठा परिणाम सुरू असल्याचेही पवार म्हणाले.

विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ – पवार

राज्य सरकारला त्याची किंमत देण्याची स्थिती असताना कृती समितीने काही मुद्दे मांडले. एक सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी मंत्र्यांनी मान्य केलीय. कर्मचाऱ्यांनी सेवेत यायला हवं. आपण मार्ग काढू शकू. कृती समितीतील सगळ्या नेत्यांचा कामगारांच्या आणि प्रवाशांचा हित बघून हा आग्रह आहे. कामगारांच्या हितासह प्रवाशांचं हितही महत्वाचं आहे. एसटी पूर्वपदावर आणा, मागण्या मान्य होतील. राज्य सरकारच्या वतीने मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय, त्याचा विचार करावा. विलीनीकरण अजूनही सरकारने शक्य नसल्याचे म्हटलंय. विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे.. त्यावर अधिक बोलायला नकोय, असे शरद पवार म्हणाले. (NCP President Sharad Pawar’s reaction to the strike and demands of ST workers)

संबंधित बातम्या

सदावर्तेंना हटवलं! पवारांसोबत झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले, फार मोठी चूक झाली…

Sharad Pawar | एस.टी.कर्मचाऱ्यांबाबत आजच सरकार का सकारात्मक झालं? पवार म्हणाले, पॉईंट असाय…

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.