AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यांच्या समस्याने त्रस्त आहात?, तर आजच ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा

सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कॉम्प्युटर, मोबाईल, टीव्ही हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र याच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहे. डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत.

डोळ्यांच्या समस्याने त्रस्त आहात?, तर आजच 'या' पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 3:56 PM
Share

सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कॉम्प्युटर, मोबाईल, टीव्ही हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र याच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहे. डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत. डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे, थकवा जाणवणे, दृष्टी कमी होणे या सारख्या समस्या उद्धभवत आहेत. तुम्ही जर सलग दोन तासांपेक्षा अधिक काळ संगणकावर काम करत असाल तर ते तुमच्या डोळ्यासाठी हानीकारणक आहे. सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोना काळात मुलांचा अभ्यास देखील ऑनलाईन झाला आहे. ते मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने अभ्यास करतात, अशा परिस्थितीमध्ये त्यांना देखील डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. डोळे हा शरिराचा अतिशय नाजूक पार्ट असतो. डोळ्याच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. आज आपण डोळ्याची काळजी कशी घ्यावी, संगणकावर काम करताना काय करावे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

डोळ्यासाठी आरोग्यदायी असलेले पदार्थ

तुम्हाला जर तुमच्या डोळ्याचे आरोग्य दीर्घकाळासाठी उत्तम ठेवायचे असेल तर तुम्ही न चुकता दररोज आपल्या आहारामध्ये मधाचा वापर करा. मधामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते. नारळ किंवा तिळाच्या तेलाने रात्री झोपताना पायाच्या तळव्याची मॉलिश करा. यामुळे डोळे निरोगी राहतात, तसेच दृष्टीदोशाची समस्या उद्भवत नाही. जेवताना ज्या पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण मोठ्याप्रमाणात आहेत अशा पदार्थांचा समावेश करा. मुगदाळ आणि पालेभाज्यांचा जेवणात नियमित उपयोग करा. तसेच आवळा देखील डोळ्यांच्या समस्यांवर उत्तम फळ आहे. आवळा नियमित खाल्ल्याने दृष्टी अधिक चांगली होण्यास मदत होते.

संगणकावर काम करताना काय काळजी घ्याल?

तुम्ही जर कामासाठी नियमित संगणकाचा वापर करत असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. संगणकावर काम करत असताना आधुनमधून ब्रेक घेत चला. सलग दोन घट्यांपेक्षा अधिक काळ काम करू नका. थोड्याथोड्या अंतराने डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तसेच डोळ्यांची उघडझाप चालू ठेवा. या गोष्टी अमलात आणल्यास नक्कीच तुमच्या डोळ्यांच्या अनेक समस्या कमी होऊ शकातात.

संबंधित बातम्या

Relationship tips: नात्यामध्ये दुरावा आलाय?, तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी, नातेसंबंध होतील अधिक मजबूत

Eye care tips : बदाम आणि तुपापासून बनवा घरीच काजळ; जाणून घ्या फायदे

Delhi : ही दिल्लीतील कॉफी आणि चहाची सर्वात खास ठिकाणे, येथे नक्की भेट द्या!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.