Pune crime| पुण्यात हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर कर्मचाऱ्याने केलं असं काही की …

तरुणी हेअर स्पा करण्यासाठी डेक्कन येथील हेअर आर्ट येथे आली होती. त्याठिकाणी मंदार साळुंखे या कर्मचारी हेअर स्पा करण्याबरोबरच असताना तिच्या मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी तिने मान वर केली असताना मसाज करताना त्याने फिर्यादी यांच्या ओठांचा किस घेतला

Pune crime| पुण्यात हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर कर्मचाऱ्याने केलं असं काही की ...
hair spa

पुणे- प्रसिद्ध हेअर स्टाईललिस्ट जावेद हबीब यांनी हेअरकट करताना महिलेच्या केसात थुंकल्याचे घटना ताजी असतानाच पुण्यातील डेक्कन परिसरातील हेअर स्पामध्ये तरुणीच्या मानेचा मसाज करताना तेथील कर्मचार्‍याने लज्जास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत हडपसर येथील तरुणीने डेक्कन पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून संबंधित तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी हेअर स्पा करण्यासाठी डेक्कन येथील हेअर आर्ट येथे आली होती. त्याठिकाणी मंदार साळुंखे या कर्मचारी हेअर स्पा करण्याबरोबरच असताना तिच्या मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी तिने मान वर केली असताना मसाज करताना त्याने फिर्यादी यांच्या ओठांचा किस घेतला. अंगाला जाणीवपूर्वक अश्लील वर्तन करत फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल यापूर्वी जावेद हबीबने घेतलेल्या वर्कशॉपमध्ये हेअरकट करून दाखवत या असताना जावेद हबीब महिलेच्या केसायात थुंकल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबंधित महिलेने आक्षेप घेतल्यानंतर जावेद हबीबने माफी सोशल मीडियावरून महिलेची माफीही मागितली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. अनेक नेटकऱ्यांनी जावेद हबीबवर टीकाही केली होती.

Sharad Pawar : एस.टी. कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण, पगारवाढीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले, वाचा जशास तसं

सिंधुदुर्गात सेना-भाजप पुन्हा आमनेसामने, उदय सामंतांना भाजप कार्यकर्त्यांचा घेराव

ST Strike | राजकीय पक्षांमुळेच हे आंदोलन पेटलं का, चिघळलं का? पवार म्हणाले, मला राजकारण करायचं नाही

Published On - 4:23 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI