AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना राणौत यांना जमिनीवर आणलं, गुणरत्न सदावर्ते प्रचंड भडकले, म्हणाले, राणौत यांनी…

गुणरत्न सदावर्ते यांनी कंगना राणौत यांच्यावर खरपूस शब्दांत टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचेही नाव घेतले. कंगना राणौत यांनी जी काही वक्तव्ये केली आहेत, त्याबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कंगना राणौत यांना जमिनीवर आणलं, गुणरत्न सदावर्ते प्रचंड भडकले, म्हणाले, राणौत यांनी...
gunaratna sadavarte and kangana ranautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2026 | 8:12 PM
Share

Kangana Ranaut On BJP Delhi Protest : कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या दिल्लीतील आंदोलनाची देशातच नव्हे तर संपूर्ण जगात चर्चा झाली. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता हे आंदोलन संपले असून आंदोलनातील प्रमुख चेहरे आपापल्या घरी परतले आहेत. दुसरीकडे भाजपाचे काही नेते मात्र सीजेपीच्या आंदोलनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यात खासदार कंगना राणौत यांचा नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांनी या आंदोलनात सामील झालेल्या तरुणाईला थेट गटरछाप म्हणून हिणवलं. जेन झीवर सडकून टीका केल्यानंतर आता कंगना राणौत यांच्यावरही अनेकजण हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील कंगना राणौतवर सडकून टीका केली आहे.

कंगना राणौत यांच्यावर केली टीका

गुणरत्न सदावर्ते यांनी कंगना राणौत यांच्यावर खरपूस शब्दांत टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचेही नाव घेतले. कंगना राणौत यांनी जी काही वक्तव्ये केली आहेत, त्याबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. युवकांनी कंगना राणौत यांच्या सिनेमातील एकाही फोटोवर टीका केलेली नाही. मोदींनीही युवकांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत घेतलेले आहे. कंगना राणौत या मोहन भागवत यांच्यापेक्षा मोठ्या नाहीत, असा हल्लाबोल सदावर्ते यांनी केला. तसेच पुढे त्यांनी सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्यावरही टीका केली. अभिजीत दीपके जे काही बोलत आहेत, ते समजण्याच्या पलीकडे आहे. त्यांनी प्रसिद्धीसाठी काहीही करू नये, असा सल्लाही सदावर्ते यांनी दिला.

मनोज जरांगे यांच्यावरही टीका

मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावरही सदावर्ते यांनी टीका केली. मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगला संवाद आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात लोकांना त्रास देऊ नये, असे शिंदे यांनी जरांगे यांना सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा सदावर्ते यांनी व्यक्त केली.

Follow Us
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...