AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारजेत 1BHK फ्लॅट, लगेच शस्त्रपरवान्याचा अर्ज; हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा उघड

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी, तिचा पती शशांक हगवणे आणि दीर सुशील यांचा नवा कारनामा समोर आला आहे.

वारजेत 1BHK फ्लॅट, लगेच शस्त्रपरवान्याचा अर्ज; हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा उघड
Hagawane brothersImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 31, 2025 | 12:33 PM
Share

पुण्यातील हगवणे बंधू, शशांक आणि सुशील यांना केवळ सव्वा महिन्याच्या कालावधीत शस्त्र परवाना मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामान्य नागरिकांना शस्त्र परवान्यासाठी सात महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत वाट पाहावी लागते, तर या बंधूंना झटपट परवाना मिळाल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यामागे त्यांचे मामा, जालिंदर सुपेकर यांच्या प्रभावामुळे कोणताही अडथळा आला नसल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या प्रकरणामुळे हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देताना खास ट्रीटमेंट मिळाल्याची शंका व्यक्त होत आहे.

अवघ्या ₹3500 मध्ये भाड्याने फ्लॅट, लगेच शस्त्र परवाना

शशांक हगवणे याने 12 ऑक्टोबर 2022 रोजी पुण्यातील वारजे भागात केवळ ₹3500 मध्ये वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 13 ऑक्टोबरला, त्याने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आणि अवघ्या 40 दिवसांत, 22 नोव्हेंबर 2022 रोजी, त्याला परवाना मिळाला. दुसरीकडे, सुशील हगवणे याने 28 सप्टेंबर 2022 रोजी कोथरूड येथे सदनिका भाड्याने घेतली. त्याने 30 सप्टेंबरला अर्ज केला आणि 1 नोव्हेंबर 2022 रोजी, म्हणजे केवळ 33 दिवसांत, त्याला शस्त्र परवान्याची मंजुरी मिळाली. तपासात असे समोर आले आहे की, दोघांनीही शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोटे पत्ते दिले होते.

वाचा: ठाण्यातील गद्दार रवी वर्माने 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकला कशी पाठवली?

पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

हगवणे बंधूंनी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड झाल्याने वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाने पुणे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जालिंदर सुपेकर यांच्या प्रभावामुळे हगवणे बंधूंना इतक्या कमी वेळात परवाना मिळाला का? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

हगवणे बंधूंवर गंभीर आरोप

शशांक आणि सुशील हगवणे सध्या अटकेत आहेत. त्यांच्यावर वैष्णवी हगवणे हिला मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यांच्या मालमत्तेचा, शस्त्र परवान्यांचा आणि इतर बाबींचा तपास सध्या सुरू आहे. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाना मिळवल्यामुळे त्यांच्यावरील गुन्ह्यांची यादी वाढत आहे.

पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

सामान्य नागरिकांना शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अनेक कागदपत्रे, तपासणी आणि लांबलचक प्रक्रियेतून जावे लागते. मात्र, हगवणे बंधूंना इतक्या कमी वेळात परवाना मिळाल्याने पोलिस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षपणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जालिंदर सुपेकर यांच्या प्रभावामुळे या प्रक्रियेत गती आली का, याचा तपास करणे आवश्यक आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?