राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी, म्हणाले, भाजपासह..
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपासह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केला. घोडेबाजार निवडून येण्या आधी भाजपने मांडला आहे. त्यांच्या करस्थानाचा आम्ही निषेध करतो, असेही त्यांनी म्हटले.

महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. राजकीय सभांचा धडाका सुरू आहे. महापालिकांवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. कुठे युती महाआघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जात आहेत तर कुठे स्वतंत्रपणे. संपूर्ण समीकरणेच या निवडणुकीत बदलली दिसत आहेत. नुकताच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असे म्हटले. कार्यकर्त्यांवर दमदाटी केल्याप्रकरणी नार्वेकरांवर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, निवडणूक आयोगावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याने निवडणूक आयोग सैराट सुटलेले आहे.
विधानसभा अध्यक्षांना जे विशेष अधिकार दिले आहेत, त्या विशेष अधिकारांचे हणन होत आहे. आर्थिक स्वरूपाचा भ्रष्टाचार, संविधानिक स्वरूपाची भ्रष्टाचार आणि व्यवस्थेमध्ये कोणाला अडकतानाचा भ्रष्टाचार या तिन्ही प्रकरणामध्ये नार्वेकर हे दोषी असल्याने त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये राष्टपतीनी बडतर्फ करायचा हवं, ही आमची मागणी आहे.
राज्यात निवडणूकीचा टप्पा 2 सुरु आहे. फ्री अँड फेअर निवडणूक संपन्न करण्याच्या धोरणाला कालिंबा फसण्याच कामं आहे. नगरपरिषद निवडणूकीत पैसे फेकले आणि तमाशा पहिला. बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपया हा तमाशा आता सुरु आहे. निवडणूका लोकशाहीच सण आहे. नागरिकांनी मतदान करणं हा अधिकार आहे. मतांचा जोगवा उमेदवाराने मागायचा असतो… ज्याला सर्वाधिक मतं मिळतात तो विजयी होतो.
हे निवडणूकिचे संस्कार आहेत… निवडणूका काही नवीन नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सगळ्यांना जागा असली पाहिजे हे धोरण होत. म्हणून पहिल्यांदा मंत्री मंडळात 6 असे मंत्री होते जे बिगर काँग्रेसचे आहेत. गाव गाडा आपण चालवतो तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण आवश्यक असतं. यांच्या सत्तेची ही भूक आता मोठी झाली आहे आणि लोकशाहीला गिळायला बसले आहेत. पैस्याचा खेळ आता पुन्हा गिरवला जात आहे. महापालिकेत आता बेशरम चारित्र्य घेऊन भाजप उतरले आहेत.
घोडेबाजार निवडणून येण्या आधी भाजपने मांडला आहे. त्यांच्या करस्थानाचा आम्ही निषेध करतो. संविधान आणि निकोप लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही हा निषेध करत अहोत. पैशांचा मोठा खेळ झाला आहे आणि निवडणूक आयोग याच मूक साक्षीदार बनला आहे. काळ आपल्याला माफ करणार नाही वेळीच आपण सावध झालो नाही तर नोटाच अधिकार आभादीत आहे…निवडणूक होत असताना लोकांना अधिकार वापरता यावा यासाठी नोटाची मशीन ठेवावी अशी आमची मागणी आहे
देशाचे राष्ट्रपती… राज्यपाल… विधानसभा अध्यक्ष … सगळे संविधान पद आहेत. निवडून आल्यावर त्यांनी कुठल्याही पक्षाशी संबंध ठेवला नाही गेला पाहिजे. पण नार्वेकर हे आधार्मी कर्तृत्व आहे… हे करंटेपण कायमस्वरूपी त्यांच्या कपाळावर गोंदवल गेलं आहे. त्यांना अध्यक्ष का केलं कारण पक्षांतर बंदी कायदा यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना मदत केली. संविधानाचा मर्डर त्यांनी केला आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा अध्यक्ष केलं.
निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केली… निवडणूक आयोगाने सकाळी आमच्या पत्राच उत्तरं देत की पुरावे द्या. यातून तो मी न्हवेच हे जे नाटक आहे ते निवडणूक आयोग करत आहे. आम्ही आंदोलन करू बोल्यावर चौकशीचे आदेश दिले आणि त्यात अधिकारी दोषी सापडले. टोकन देऊनही त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाही. कारण राहुल नार्वेकर तिथे जाऊन दम दाटी करतात… दुपारी 4 नंतरचं cctv गायब केलं.
एखादी मवाली जशी दमदाटी करतो तशी ते करत आहेत. आपला अध्यक्ष इतकी चिप वर्तन करत आहे. राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात कोण कामं करतात याची माहिती आम्ही घेतं आहोत. जे गुंड आणि भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना तिथे पदावर बसवलं आहे. निवडणूक आयोग गप्प का आहे… त्या अधिकाऱ्याची चुकी दिसून येत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.
