AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी बापाचंच काळीज ना…स्वतः आगीत होरपळत होता पण मुलांना…घटना ऐकून डोळ्यातच पाणी येईल

कृष्णा यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकंही गोळा झाले होते, त्यामध्ये कृष्णा यांना लागलेली आग विझवण्यात आली, तात्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शेवटी बापाचंच काळीज ना...स्वतः आगीत होरपळत होता पण मुलांना...घटना ऐकून डोळ्यातच पाणी येईल
Image Credit source: Google
| Updated on: Feb 06, 2023 | 7:52 AM
Share

नाशिक : अशा काही घटना असतात ना, ज्याची कल्पना केली तरी डोळ्याचा कडा पाण्यानं भरून येतात. अशीच एक दुर्दैवी घटना (Sad News) नाशिकमध्ये घडलीय. ही घटना ज्या-ज्या व्यक्तीच्या कानावर पडतेय तो प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे. गॅरेजमध्ये काम करत असतांना एकाचा आगीत होरपळून मृत्यू (Death) झाला आहे. पण यावेळी त्याने जे काही केलंय ते अंगावर काटा आणणारे आहे. त्यामुळे नाशिकच्या (Nashik News) सिडकोतील घटना वाऱ्यासारखी पसरली असून शेवटी बापचंच काळीज ते…असे शब्द आपसूकच तोंडातून बाहेर पडत आहे. नाशिकमधील ही दुर्दैवी घटना वडील असणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

अंबड परिसरात राहणारे कृष्णा राजकुमार विश्वकर्मा एक फेब्रुवारीला आपल्या स्वतःच्या गॅरेजमध्ये रात्रीच्या वेळी काम करत होते.

रात्रीच्या वेळी लाईट गेल्याने त्यांनी मेणबत्ती पेटवून काम सुरू केले. पण याचवेळी मेणबत्ती अचानक खाली पडली. त्यामध्ये खाली पडलेल्या थिनरने पेट घेतला आणि त्यात कृष्णा हे जखमी झाले होते.

परंतु याच वेळी गॅरेजमध्ये कृष्णा यांची दोन्ही मुलं होती. कृष्णा यांच्या कपड्यांना आग लागताच मुलं जवळ येत होती. त्यामध्ये कृष्णा त्यांना बाजूला ढकलत होते. जवळ येऊ नका म्हणून ओरडत होते.

शेवटी बापाचंच काळीज ना ते, मुलांना आपल्यामुळे कुठलीच दुखापत होता कामा नये, म्हणून स्वतःजवळ त्यांना येऊ न देणे यासाठी त्यांना ढकलत होते. आणि स्वतःला लागलेली आग विझवत होते.

कृष्णा यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकंही गोळा झाले होते, त्यामध्ये कृष्णा यांना लागलेली आग विझवण्यात आली, तात्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कृष्णा यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, यानंतर अंबड पोलीस ठाण्यात कृष्णा यांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कृष्णा यांनी यावेळी स्वतःचा जीव धोक्यात असतांना मुलं आपल्याजवळ येत असतांना त्यांना ढकलुन देत त्यांना जवळ येऊ नका म्हणून सांगणे आणि त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.