राज्यात दोन दिवसात पाच पटीने कोरोना रुग्णांची वाढ, 24 तासात 4 हजार बाधितांची नोंद

कोरोना व्हाक्सिन दुसरा डोस द्यायला सुरुवात झाली आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. (Rajesh Tope Corona Patient Increase)

राज्यात दोन दिवसात पाच पटीने कोरोना रुग्णांची वाढ, 24 तासात 4 हजार बाधितांची नोंद
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 6:32 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात 5 पटीने वाढ झाली आहे. महाराष्ट्रात 11 फेब्रुवारीला राज्यात 652 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर काल तब्बल 4092 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. (Health Minister Rajesh Tope Comment On Maharashtra Corona Patient Increase)

राज्यातील कोरोना संख्या 600 ने वाढली आहे. काल हा आकडा चार हजारावर पोहोचला होता. राज्यात कोरोना वाढत आहे. विदर्भ आणि मुंबईत आकडे वाढत आहेत, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. आजपासून कोरोना व्हाक्सिन दुसरा डोस द्यायला सुरुवात झाली आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 24 तासात 4 हजार बाधितांची नोंद

महाराष्ट्रात 11 फेब्रुवारीला राज्यात 652 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर 13 फेब्रुवारीला 3 हजार 670 जणांना कोरोनाची लागण झाली. तर काल तब्बल 4092 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशाचा कोरोना आकडा वाढला 

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे देशभरातील कोरोना आकडाही वाढत चालला आहे. रविवारी भारतात 11 हजार 431 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 हजार 267 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.

गेल्या 24 तासात 87 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 2,073 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 26 नोव्हेंबरनंतर कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांमध्ये ही सर्वात मोठी वाढ आहे. 26 नोव्हेंबरला तब्बल 2927 अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. (Health Minister Rajesh Tope Comment On Maharashtra Corona Patient Increase)

देशात आतापर्यंत 1.09 कोटी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 1.06 कोटी जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1.55 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 1.36 लाख जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

पाच राज्यांची कोरोना अपडेट

1. दिल्ली

राजधाना दिल्लीत रविवारी 150 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 158 जण कोरोनामुक्त झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीत आतापर्यंत 6 लाख 36 हजार 946 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 6 लाख 25 हजार 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 10 हजार 891 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 1031 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

2. मध्यप्रदेश

मध्यप्रदेशात रविवारी 223 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 205 जण कोरोनामुक्त झाले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशात आतापर्यंत 2 लाख 57 हजार 646 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 2 लाख 51 हजार 970 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर 3834 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. सद्यस्थितीत 1,842 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (Health Minister Rajesh Tope Comment On Maharashtra Corona Patient Increase)

3. गुजरात

राज्यात रविवारी 247 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 270 जण कोरोनामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 लाख 65 हजार 244 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 2 लाख 59 हजार 104 जण बरे झाले आहेत. यातील 4,401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1739 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

4. राजस्थान

राज्यात रविवारी 103 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 103 जण कोरोनामुक्त झाले आहे. सुदैवाने काल एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत 3 लाख 18 हजार 923 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 3 लाख 14 हजार 733 जण बरे झाले आहेत. यातील 2781 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1409 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

5. महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी राज्यात 4,092 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यात 1,355 जण कोरोनामुक्त झाले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 20 लाख 64 हजार 278  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 19 लाख 75 हजार 603 जण बरे झाले आहेत. यातील 51 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 35 हजार 965 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

कोरोना विषयावरून राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये: अजित पवार

ग्रामस्थ आणि नागरिक मास्क वापरत नाहीत. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोरोनासंदर्भात कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील, असा इशाराही अजित पवारांनी दिलाय. काही लोक कोरोनाबाबत नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका केली. पण कोरोना वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये, असंही अजित पवार म्हणालेत. कोरोना पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमावली लावली पाहिजे, मी मुंबईला गेल्यानंतर राज्य प्रमुखांशी बोलून तातडीने निर्णय घेऊ, असंही अजित पवारांनी सांगितलंय. (Health Minister Rajesh Tope Comment On Maharashtra Corona Patient Increase)

संबंधित बातम्या : 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोठा निर्णय घेणार; अजित पवारांचे संकेत

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.