AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी, पोलिसांच्या पथकांकडून शोध सुरू

पुण्यातील बिल्डर खलील शेख यांनी आत्महत्या केली आहे, या प्रकरणात आता रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या अडचणी वाढल्या आहेत, त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

मोठी बातमी! रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी, पोलिसांच्या पथकांकडून शोध सुरू
ravindra DhangekarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 19, 2026 | 4:42 PM
Share

पुण्यातील बिल्डर खलील शेख यांनी आत्महत्या केली आहे, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ तयार केला होता, तसेच चिठ्ठी देखील लिहिली होती. या व्हिडीओमध्ये खलील शेख यांनी गंभीर आरोप करत काही नेत्यांसह नगरसेवकांची नावं देखील घेतली होती. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, पोलिसांकडून थेट कारवाईला सुरुवात झाली आहे. दरम्यान या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात रवींद्र धगेंकर आणि त्यांच्या पत्नीवर देखील पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर नॉट रिचेबल आहेत.

आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे रवींद्र धंगेकर यांच्यासह 14 आरोपीना शोधण्यासाठी स्वारगेट पोलिसांकडून अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या संदर्भात या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून वकीलामार्फत अटक पूर्व जामीनसाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारनंतर पुणे सत्र न्यायालयात रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

दरम्यान या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी होणार आहे. परंतु त्यापूर्वी अटक होण्याची शक्यता असल्यामुळे रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर नॉट रिचेबल झाल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. खलील शेख यांनी आत्महत्या केली, त्यांनी आत्महत्येपूर्वी धंगेकर यांनी लक्ष दिलं नाही, असं म्हटलं होतं, त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही, असा दावा रवींद्र धंगेकर यांच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान सोमवारी धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मिळणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. पोलिसांकडून आता रवींद्र धंगेकर आणि त्यांचा पत्नीचा शोध सुरू आहे. त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...