AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सनई चौघडे वाजले तिथे दुसऱ्याच दिवशी मातम, अंगावरची हळद उतरण्याआधीच नवरीचा मृत्यू, धक्क्याने बापही दगावला; अख्ख्या जिल्ह्यात हळहळ

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जानकीचा विवाह १३ मे रोजी झाला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिचं अकस्मात निधन झालं. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र दहा दिवसांनी दुःखाने व्याकुळ झालेल्या तिच्या वडिलांनीही प्राण सोडले. ही घटना संपूर्ण गावासाठी हृदयद्रावक आहे.

सनई चौघडे वाजले तिथे दुसऱ्याच दिवशी मातम, अंगावरची हळद उतरण्याआधीच नवरीचा मृत्यू, धक्क्याने बापही दगावला; अख्ख्या जिल्ह्यात हळहळ
अंगावरची हळद उतरण्याआधीच नवरीचा मृत्यू,
| Updated on: May 30, 2025 | 10:39 AM
Share

लग्न ठरणं हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत भावी आयुष्याची स्वप्न रंगवणं सगळ्यांनाच आवडतं. लग्न ठरल्यावर सोलापूरच्या जानकीनेही अशीच स्वप्न रंगवली होती. पण ती क्षणभुंगर ठरली कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अं काही घडलं की जिथे लग्न लागलं होतं, त्याच घरावर शोककळा पसरली, दु:खाचे विलाप ऐकू येऊ लागले, लोकांच्या डोळ्यातलं पाणीच खळेना. नेमकं झालं तरी काय ?

13 मे रोजी माढा तालुक्यातील घोटी येथील बाळासाहेब गळगुंडे यांची मुलगी जानकीचा माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव येथील समीर पराडे याच्याबरोबर विवाह झाला. अक्षता पडल्या, सप्तपदी झाल्या आणि समीरसोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवत जानकीने पराडेंकडे गृहप्रवेशही केला. मात्र दुसऱ्याच दिवशी आक्रीत घडलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच सकाळी जानकीच्या छातीमध्ये दुखू लागलं, तिला तातडीने अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होतं मात्र रस्त्यातच घात झाला आणि जानकीचा मृत्यू झाला.

हातावरची मेंदी, चुड्याने भरलेलं मनगट, हळकुंड, लग्नाची लागलेली हळद.. सगळं सगळं तिथेच सोडून, एका दिवसापूर्वी लग्न लागलेली जानकी सर्वांना सोडून गेली. तिच्या जाण्याने पतीसह सासरच्यांना तर धक्का बसलाच पण तिच्या माहेरच्यांवर तर दु:खाचा डोंगरच कोसळला. काल जिची साश्रूनयनांनी, पण समाधानाने सासरी पाठवणी केली, त्याच मुलीच्या मृत्यूच्या बातमीने गळगुंडे यांच्या घरात शोककळा पसरली.

मुलीचा विरह साहवेना, 10 व्या दिवशी पित्याने घेतला अखेरचा श्वास

मात्र गळगुंडे यांच्या दु:खाचे दिवस अजूनही सरलेच नाहीत. कारण जानकीच्या मृत्यूचा तिच्या वडिलांनाही सर्वात मोठा धक्का बसला. नुकतंच लग्न झालेल्या, संसारातून उठून गेलेल्या लेकीच्या मृत्यूने तिचे वडील बाळासाहेब गळगुंडे हे शोकविव्हल झाले आणि मुलीच्या मृत्यूच्या 10 व्या दिवशीच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. जानकीच्या 10 व्या चे विधि पार पडले आणि तेव्हाच बाळासाहेब गळगुंडे यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि क्षणात कोसळले. त्यांनी तेथेच अखेरचा श्वास घेतला. आधी लेक, नंतर घरचा कर्ता पुरुष पाठोपाठा ेल्यामुळे त्यामुळे त्यांच्या कुटुंबात तर हाहाकार उडाला.

मुलीवचर बापाचं जीवापाड प्रेम असतं.. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ही घटना असल्याचे मत अनेतकांनी व्यक्त केले असून मुलीपाठोपाठ वडिलांनचाही मृत्यू झाल्याने माढ्यातील गावकरी हळहळले आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.