AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळी वाऱ्यांसह मुसळधार… मान्सूनपूर्वचा कहर, या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं; नागरिकांची उडाली तारांबळ

Maharashtra Rain Update : काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्या वर गेला आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये मात मान्सूनपूर्व पावसाचा कहर पहायला मिळत आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यांसह मुसळधार... मान्सूनपूर्वचा कहर, या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं; नागरिकांची उडाली तारांबळ
Heavy Rain NewsImage Credit source: Google
| Updated on: May 23, 2026 | 6:59 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्या वर गेला आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये मात मान्सूनपूर्व पावसाचा कहर पहायला मिळत आहे. नांदेड शहरासह विविध भागात आज पाऊस पडला. बारड येथे आठवडी बाजार सुरु असताना अचानक आलेल्या वादळी पावसामुळे बाजारातील ग्राहक आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली. या पावसामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची मोठी धावपळ झाली. वादळी वाऱ्यामुळे ताडपत्री उडून गेल्यामुळे बाजारातील हॉटेल मधील अन्नपदार्थ, किराणा दुकानातील सामान भिजले आहे, यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर वादळी वारे

छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक जोराचे वादळी वारे सुरू झाले आहेत. वादळी वाऱ्यांमुळे शहरातील नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणी येत आहेत. विशेषतः मोटारसायकल चालकांना रस्त्यावर वाहन चालवणे कठीण झाले आहे. अचानक ढग दाटून आल्याने दिवसा अंधार झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नागरिक सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

पुणे : शिंदोडी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

शिंदोडी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे 100 केव्हीचे विद्युत रोहित अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्या वेळी परिसरात शेतकरी व मजूर नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्युत पुरवठाही विस्कळीत झाला आहे. शेतकऱ्यांनी संबंधित वीज वितरण विभागाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली असून संभाव्य धोका टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

अहिल्यानगरमध्येही पावसाची हजेरी

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परभणीतही वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक पाऊस सरू झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

भोर तालुक्याला मान्सून पूर्व पावसाचा फटका

काल पुण्याच्या भोर तालुक्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसाचा फटका मांढरदेवी रोडवरील दुकानांही बसला आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मांढरदेवी रोडवरील चौपाटी परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले होते. या पाण्यामुळे दुकानातले साहित्य भिजल्यानं दुकानदारांचे मोठे नुकसान झालं आहे. यातील एका दुकानंदाराचा 15 पोती कांदा भिजला आहे. भोर तालुक्यात काल पूर्व मौसमी पावसाने हजेरी लावली होती. पहिल्याच मुसळधार पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पहायला मिळालं. दुर्दैवी बाब म्हणजे एकाचा वीज अंगावर पडल्यानं मृत्यू झाला आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा